Riteish - Raja Shivaji OTT : 'छत्रपती शिवाजी महाराजांची' गाथा घरबसल्या पाहता येणार; रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' ओटीटीवर कुठे अन् कधी पाहाल?

Raja Shivaji OTT Release Update : रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यावर ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे ओटीटी रिलीज अपडेट जाणून घेऊयात.
Raja Shivaji OTT Release Update
Riteish - Raja Shivaji OTT SAAM TV
Published On
Summary

'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला रिलीज झाला.

'राजा शिवाजी' घरबसल्या ओटीटीवर पाहायला मिळणार आहे.

'राजा शिवाजी' मधून शिवरायांची यशोगाथा सांगण्यात आली आहे.

सध्या बॉक्स ऑफसिवर फक्त 'राजा शिवाजी' चित्रपटाची हवा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने दोन आठवड्यात बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटाला मराठी आवृत्तीत भरपूर प्रतिसाद मिळाला आहे. शो हाऊसफुल पाहायला मिळाले. आता मात्र चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. याचे मोठे अपडेट समोर आले आहेत. 'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला रिलीज झाला आहे. 'राजा शिवाजी' घरबसल्या कधी पाहता येणार, जाणून घेऊयात.

'राजा शिवाजी' ओटीटी अपडेट

सर्वत्र 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची चर्चा पाहायला मिळत आहे. 'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिसवर यशस्वी कामगिरी करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट जिओ हॉटस्टारवर या ओटीटी प्लेटफॉर्मवर रिलीज होणार असल्याचे बोले जात आहे. जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैमध्ये चित्रपट ओटीटीवर पाहायला मिळू शकतो असे बोले जात आहे. मात्र अद्याप ओटीटी प्लेटफॉर्म आणि ओटीटी रिलीज डेट याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.

'राजा शिवाजी' चित्रपट थिएटरमध्ये मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट ओटीटीवर मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा ६ भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे बोले जात आहे. मात्र याचीही अद्याप अधिकृत माहिती नाही.

'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिस कलेक्शन

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपटाची भारतातील एकूण ग्रॉस कमाई ९२.८१ कोटी रुपयांवर पोहोचली आहे, तर भारतातील एकूण नेट कमाई ७८.४० कोटी रुपयांवर गेली आहे. 'राजा शिवाजी' चित्रपटात हिंदी, मराठी कलाकार झळकले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'राजा शिवाजी' हा चित्रपट ७५-१०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. चित्रपटात सलमान खान, जिनिलिया, अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन असे अनेक कलाकार झळकले आहेत.

Raja Shivaji OTT Release Update
NEET Paper Leak : "...म्हणून अशिक्षितांना सत्तेत बसवू नका"; नीट पेपर फुटी प्रकरणावर प्रसिद्ध गायक भडकला, केली मोठी मागणी| VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com