Riteish - Raja Shivaji Collection : पैसाच पैसा! रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' हाऊसफुल, १०० कोटींपासून काही पावले दूर

Raja Shivaji Box Office Collection Day 13 : रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट थिएटरमध्ये हाऊसफुल पाहायला मिळत आहे. चित्रपटाने दोन आठवड्यात छप्परफाड कमाई केली आहे.
Raja Shivaji Box Office Collection Day 13
Riteish - Raja Shivaji Collection SAAM TV
Published On
Summary

'राजा शिवाजी' चित्रपटाला अजय-अतुल यांनी संगीत दिले आहे.

'राजा शिवाजी' १ मे ला थिएटरमध्ये रिलीज झाला.

'राजा शिवाजी' चित्रपटाच्या मराठी आवृत्तीने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली.

रितेश देशमुखची मुख्य भूमिका असलेल्या 'राजा शिवाजी' (Riteish - Raja Shivaji ) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १३ दिवसांत तगडी कमाई केली आहे. या चित्रपटातून मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, त्याग आणि पराक्रमाची गाथा सांगण्यात आली आहे. आता हा चित्रपट ९० कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा गाठण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या बुधवारची कमाई पाहूया.

'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १३

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'राजा शिवाजी' चित्रपटाने १३ व्या दिवशी ३,७७० शोजमधून १.९० कोटी रुपयांची कमाई केली. मंगळवारच्या २.५० कोटी रुपयांच्या निव्वळ कमाईच्या तुलनेत ही २४.०% ची घट दर्शवते. चित्रपटाची भारतातील एकूण ग्रॉस कमाई ८८.८८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. दरम्यान, भारतातील चित्रपटाची नेट कमाई आतापर्यंत ७५.०५ कोटी रुपये इतकी झाली आहे. 'राजा शिवाजी' हिंदी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

'राजा शिवाजी' दिवसानुसार कमाई (भारतातील नेट)

  • दिवस १ (हिंदी): ३.३५ कोटी रुपये; (मराठी): ८ कोटी रुपये

  • दिवस २ (हिंदी): ३.४० कोटी रुपये; (मराठी): ७.१५ कोटी रुपये

  • दिवस ३ (हिंदी): ४.२५ कोटी रुपये; (मराठी): ७.७५ कोटी रुपये

  • दिवस ४ (हिंदी): १.३५ कोटी रुपये; (मराठी): ४.२५ कोटी रुपये

  • दिवस ५ (हिंदी): १.५५ कोटी रुपये; (मराठी): ३.३५ कोटी रुपये

  • दिवस ६ (हिंदी): १.२५ कोटी रुपये; (मराठी): ३ कोटी रुपये

  • दिवस ७ (हिंदी): १.२५ कोटी रुपये; (मराठी): २.७५ कोटी रुपये

  • दिवस ८ (हिंदी): ०.७० कोटी रुपये; (मराठी): २.५० कोटी रुपये

  • दिवस ९ (हिंदी): १.३२ कोटी रुपये; (मराठी): ४.२५ कोटी रुपये

  • दिवस १० (हिंदी): १.८० कोटी रुपये; (मराठी): ५ कोटी रुपये

  • दिवस ११ (हिंदी): ०.५० कोटी रुपये; (मराठी): १.९० कोटी रुपये

  • दिवस १२ (हिंदी): ०.६५ कोटी रुपये; (मराठी): १.८५ कोटी रुपये

  • दिवस १३ (हिंदी): ०.५० कोटी रुपये; (मराठी): १.४० कोटी रुपये

  • एकूण: ७५.०५ कोटी रुपये

'राजा शिवाजी' स्टारकास्ट

'राजा शिवाजी' चित्रपटात हिंदी, मराठी कलाकार झळकले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'राजा शिवाजी' हा चित्रपट ७५-१०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. चित्रपटात सलमान खानचा cameo सुद्धा पाहायला मिळत आहे. सलमान खानने जीवा महाला यांची भूमिका साकारली आहे.

Raja Shivaji Box Office Collection Day 13
Bollywood Actress : १६ वर्ष बॉलिवूडमध्ये काम केले; अभिनेत्रीने आता भारत सोडला, नेमकं कारण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com