Sukanya Samriddhi Yojana: मुलींसाठी खास योजना! २१ वर्षांची झाल्यानंतर मिळणार ७१.८२ लाख रुपये; कॅल्क्युलेशन वाचा

Sukanya Samriddhi Yojana: केंद्र सरकारने मुलींसाठी खास सुकन्या समृद्धी योजना सुरु केली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला लाखो रुपये मिळणार आहे. मुलगी २१ वर्षाची झाल्यावर जवळपास ७१.८२ लाख रुपये मिळतील.
Sukanya Samruddhi Yojana
Sukanya Samruddhi YojanaSaam T
Published On
Summary

मुलींसाठी खास सुकन्या समृद्धी योजना

लेकीच्या शिक्षणासाठी जमा होतील लाखो रुपये

२१ वर्षानंतर मिळतील ७१.८२ लाख रुपये

मुलींच्या शिक्षणाच्या, लग्नाच्या खर्चाचे टेन्शन प्रत्येक आईवडिलांना असते. लेकीच्या शिक्षणासाठी आतापासूनच बचत करणे गरजेचे आहे. शिक्षण खूप महागलं आहे. उच्च शिक्षणासाठी लाखो रुपये फी भरावी लागते. हे एवढे पैसे एकदम जमा करणे शक्य होत नाही. यासाठीच सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरु केली आहे. सुकन्या समृद्धी योजनेत तुम्हाला चांगला परतावा मिळतो.

Sukanya Samruddhi Yojana
Post Office Scheme: दिवसाला ३३३ रुपये गुंतवा अन् ₹१७००००० मिळवा; पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना

लेकीच्या शिक्षणासाठी सुकन्या समृद्धी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतील गुंतवणूक ही सुरक्षित असते. या योजनेत टॅक्स बेनिफिटदेखील मिळते याचसोबत व्याजदेखील चांगले मिळते. दरम्यान, या योजनेत तुम्हाला २० वर्षांसाठी गुंतवणूक करायची असते. यामुळे तुम्हाला लाखो रुपये मिळतील.

२१ वर्षानंतर मिळणार एवढे पैसे

जर तुम्ही लेकीच्या पहिल्या वाढदिवसापासून दरवर्षी १.५ लाख रुपये गुंतवले. एकूण १५ वर्षांसाठी पैसे जमा करायचे असतात. परंतु अकाउंट २१ वर्षानंतर मॅच्युर होते. त्यामुळे तुम्हाला चांगला परतावा मिळेल.

सध्या सुकन्या समृद्धी योजनेत ८.२ टक्के व्याजदर मिळते. तुम्ही १५ वर्षांसाठी २२.५ लाख रुपये गुंतवणार आहेत. २१ वर्षापर्यंत तुम्हाला ४४.७५ लाख रुपये मिळू शकतात. २१ वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर तुम्हाला जवळपास ७१.८२ लाख रुपये मिळू शकतात.

Sukanya Samruddhi Yojana
Government Scheme: खुशखबर! महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला ₹३००० येणार; नवीन योजनेची घोषणा

सुकन्या समद्धी योजना ही मुलींसाठी सुरु करण्यात आली आहे. मुलींचे भविष्य उज्जवल व्हावे. त्यांना कधीही आर्थिक अडचण येऊ नये. यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत सर्वाधिक व्याजदर मिळते. त्यामुळे मॅच्युरिटीनंतर मिळणारी रक्कमदेखील जास्त असते. यामुळे तुम्हाला भविष्यात खूपच फायदा होईल.

Sukanya Samruddhi Yojana
Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा, फक्त व्याजातून मिळणार 4.50 लाख

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com