Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा, फक्त व्याजातून मिळणार 4.50 लाख

Post Office NSC Scheme: पोस्टाच्या पुढील योजनेत तुम्हाला एकूण ४.५ लाखांचे व्याज मिळेल. तसेच तुम्हाला ७ टक्के व्याजही मिळेल. ही सेविंग स्कीम सध्या चर्चेत आहे.
Post Office NSC Scheme
Post Office NSC Schemegoogle
Published On

प्रत्येकालाच भविष्यासाठी थोडी गुंतवणूक करायची असते. पण त्यातुन तुम्हाला जास्त फायदा मिळाला तर अजूनच उत्तम. पुढील पोस्टाच्या स्कीममध्ये तुम्हाला तुमच्या गुंतवणूकीच्या रक्कमेवर ४.५० लाख व्याज मिळणार आहे. याचा फायदा तुम्हाला भविष्यात खूप जास्त आहे. पुढील बातमीत याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

कुटुंब मध्यम वर्गीय असो वा उच्च वर्गीय तुम्हाला सेविंग करणं गरजेचं असतं. तुमच्या पगारातली काही रक्कम बाजूला काढून तुम्हाला त्यावरील व्याजाचा लाभ घेता येतो. रिटायरमेंटनंतर तुम्हाला याचा फायदा होतो. तर पोस्टाच्या या योजनेचं नाव हे नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम (Post Office NSC Scheme) आहे. यामध्ये तुम्ही ४.५० लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळतं.

Post Office NSC Scheme
SSC Supplementary Exam 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! या दिवसापासून पुरवणी परीक्षेसाठी करता येणार अर्ज

पोस्टाची ही योजना खूप प्रसिद्ध आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक होत नाही. शिवाय सरकार या योजनेची संपूर्ण जबाबदारी घेतं. तुम्हाला या योजनेत ७.७ टक्के इतकं व्याज मिळतं. मॅच्युरिटी झाल्यावर तुम्हाला हे पैसे थेट खात्यात जमा केले जातात. याचा कालावधी हा एकूण ५ वर्षांचा असतो. हा पूर्ण झाला की, तुम्हाला तुमच्या रक्कमेवर ७ टक्के व्याज मिळतं.

पोस्टाच्या या स्कीमचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही यामध्ये १००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. यात कोणतीही मर्यादा नसते. तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल तितका जास्त नफा तुम्हाला तुम्हाला होतो. तुम्हाला यामध्ये मुलांच्या नावानेही खातं उघडता येतं. नियमांनुसार, १० वर्षांखालील मुलांचं खातं पालक चालवू शकतात. या सरकारी योजनेतील गुंतवणुकीवर मिळणारं व्याज ५ वर्षांनंतर तुमच्या खात्यात जमा केलं जातं. एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांपर्यंतच्या टॅक्सची बचत करता येते.

फक्त व्याजातून ४.५० लाख रुपये कसे मिळतील?

जर तुम्हाला या स्कीममधून व्याजातून ४ लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करायची असेल तर ते खूप सोपं आहे. यासाठी तुम्हाला एकरकमी १० लाख रुपये गुंतवावे लागतील. एनएससी योजनेच्या ७.७% व्याजाच्या दरानुसार, तुम्हाला पाच वर्षांच्या लॉक-इन कालावधीपर्यंत त्यात राहावं लागेल. यानंतर, तुमच्या गुंतवणुकीवरील एकूण निधी १४,४९,०३४ रुपये होईल. विशेष गोष्ट म्हणजे फक्त व्याजातून मिळणारी कमाई ४,४९,०३४ रुपये असेल. गुंतवणुकीची रक्कम वाढवून तुम्ही जास्त कमाई करू शकता.

Post Office NSC Scheme
Tamilnadu Tourism: मे महिना कायम राहील आठवणीत, तमिळनाडूतल्या या स्वर्गाहून सुंदर ठिकाणांना नक्कीच द्या भेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com