Tamilnadu Tourism: मे महिना कायम राहील आठवणीत, तमिळनाडूतल्या या स्वर्गाहून सुंदर ठिकाणांना नक्कीच द्या भेट

Sakshi Sunil Jadhav

उन्हाळ्याच्या सुट्ट्या

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कमी बजेटमध्ये तुम्हाला लांब फिरण्याचा प्लान करायचा असेल तर तमिळनाडू आणि तिथली प्रसिद्ध ठिकाणं बेस्ट आहेत.

Tamil Nadu tourist places | google

ऊटी

तमिळनाडूतील सर्वात सुंदर आणि थंड हवेचं ठिकाण आहे. तिथे तुम्हाला चहाचे मळे आणि निसर्गाचा आनंद घेता येईल. प्रवासासाठी तुम्हाला मुंबईहून कोयंबतूरपर्यंत फ्लाइट किंवा ट्रेनने जाऊन पुढे टॅक्सी किंवा बसने ऊटीला पोहोचता येतं.

Tamil Nadu summer travel

कोडाईकनाल

कोडाईकनालला ‘प्रिन्सेस ऑफ हिल स्टेशन’असं म्हणतात. धबधबे, तलाव आणि धुक्याने भरलेले डोंगर तुम्हाला इथे पाहायला मिळेल. प्रवासासाठी तुम्हाला मुंबईहून मदुराईपर्यंत फ्लाइट घेऊन पुढे बस किंवा कॅबने कोडाईकनालला जाता येतं.

Kodaikanal travel

चेन्नई

तमिळनाडूची राजधानी चेन्नई समुद्रकिनारे, खाद्यसंस्कृती आणि ऐतिहासिक मंदिरांसाठी प्रसिद्ध मानली जाते. प्रवासासाठी तुम्हाला रोज फ्लाइट आणि ट्रेन उपलब्ध आहेत.

Chennai tourism

मदुराई

मदुराई हे प्राचीन मंदिरांचं शहर म्हणून ओळखलं जातं. मीनाक्षी अम्मन मंदिराची भव्य वास्तू पर्यटकांना आकर्षित करतं. मुंबईहून मदुराईसाठी थेट फ्लाइट तसेच ट्रेनची सुविधा उपलब्ध आहे.

Madurai

रामेश्वरम

समुद्राच्या मधोमध असलेलं रामेश्वरम धार्मिक आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. तिथे तुम्ही पंबन ब्रिजवरून नक्कीच प्रवास करा. तुम्ही मुंबईहून मदुराई किंवा चेन्नईमार्गे ट्रेनने रामेश्वरमला पोहोचू शकता.

Rameswaram travel guide

यरकौड

कमी खर्चात शांत आणि सुंदर हिल स्टेशन अनुभवायचं असेल तर यरकौड चांगला पर्याय आहे. मुंबईहून सेलमपर्यंत ट्रेन किंवा फ्लाइटने जाऊन पुढे बसने यरकौडला जाता येतं.

Yercaud hill station

कन्याकुमारी

तीन समुद्रांचा संगम असलेलं कन्याकुमारी सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. मुंबईहून ट्रेन किंवा फ्लाइटने तिरुवनंतपुरममार्गे कन्याकुमारीला जाता येतं.

Kanyakumari tourism

महाबलीपुरम

युनेस्को जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेलं महाबलीपुरम प्राचीन शिल्पकला आणि समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. चेन्नईहून अवघ्या काही तासांत रोड ट्रिपने महाबलीपुरमला पोहोचता येतं.

Mahabalipuram

NEXT: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! या दिवसापासून पुरवणी परीक्षेसाठी करता येणार अर्ज

Maharashtra board 10th exam
येथे क्लिक करा