Government Scheme: खुशखबर! महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला ₹३००० येणार; नवीन योजनेची घोषणा

West Bengal Annapurna Bhandar Scheme: बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन झाले आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अन्नपूर्णा भंडार योजना सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. आता पुढच्या महिन्यात प्रत्यक्षात ही योजना सुरु केली जाणार आहे.
Government Scheme
Government SchemeSaam Tv
Published On
Summary

बंगाल सरकारची मोठी घोषणा

महिलांसाठी अन्नपूर्णा भंडार योजना सुरु

महिलांना मिळणार प्रत्येकी ₹३०००

पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाले. सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता सरकार लवकरच महिलांसाठी अन्नपूर्णा भंडार योजना सुरु करणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी महिलांसाठी अन्नपूर्ण भंडार सामाजिक कल्याण योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता ही योजना प्रत्यक्षात लागू होणार आहे.

Government Scheme
LIC Scheme: LICची जबरदस्त योजना! दररोज ४५ रुपये गुंतवा अन् २५ लाख मिळवा

१ जूनपासून महिलांना मिळणार ₹३०००

बंगाल सरकारच्या अन्नपूर्णा भंडार योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा केले जाणार आहेत. १ जूनपासून हे पैसे जमा केले जाणार आहेत. बंगाल राज्य सरकारने याबाबत सोमवारी अधिकृत माहिती दिली. त्यामुळे महिलांच्या खात्यात १ जूनपासून ३००० रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

राज्य सरकारने दिली माहिती

मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेताच पहिल्याच दिवशी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी आपली आश्वासने पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. काल सरकारची पहिली कॅबिनेट बैठक झाली. बैठकीनंतर राज्य सरकारने अन्नपूर्णा भंडार योजना सुरु करण्याची तारीख सांगितली.

Government Scheme
Ladki Bahin Yojana: मे महिन्याची १० तारीख उजाडली! लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० की ४५०० रुपये येणार? पाहा सविस्तर अपडेट

बंगाल सरकारने अजून एक महत्त्वाची घोषणा केली आहे. महिलांना सरकारी बसमधून प्रवास मोफत असणार आहे. १ जूनपासून त्यांना कोणतेही पैसे द्यावे लागणार नाही. त्यामुळे महिलांच्या खात्यात पुढच्या महिन्यापासून प्रत्येकी ३००० रुपये जमा केले जाणार आहेत.

Government Scheme
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ₹३००० एकत्र मिळणार; लाभार्थी महिलांचा आकडा आला समोर, वाचा अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com