

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी
मे महिन्याचे १० दिवस उलटले तरी पैसे जमा नाही
लाडक्या बहिणींना ३ महिन्याचे ₹४५०० एकत्र मिळणार
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी अजूनही मार्च महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आता मे महिना सुरु झाला. मे महिन्याचे पहिले १० दिवसदेखील उलटून गेले तरीही तीन महिन्यांपैकी एकही हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, मे महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लाडक्या बहिणींना ३००० की ४५०० रुपये मिळणार? (Ladki Bahin Yojana Will Women Get 3000 or 4500 Rupees)
लाडकी बहीण योजनेत महिलांना ३ महिन्यांपासूनचा हप्ता मिळालेला नाही. मार्च एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे महिलांना या महिन्यात ४५०० रुपये एकत्र मिळणार आहेत. मागच्या महिन्यात मार्च आणि एप्रिलचे ३००० रुपये एकत्र येतील, अशी चर्चा सुरु होती. मात्र एकाही महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे या महिन्यात ३ महिन्याचे पैसे एकत्र येऊ शकतात. महिलांच्या खात्यात कधीही पैसे जमा होऊ शकतात. अद्याप अजून अधिकृत तारीख समोर आलेली नाही.
लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार (Ladki Bahin Yojana March April May Installment)
शासन निर्णयानुसार, लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत हप्ता जमा व्हायला हवा होता. परंतु अजूनही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेला नाही. एकही आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे १० तारखेच्या आधी जमा केलेले नाही. त्यामुळे या महिन्यातदेखील हप्ता उशिरा येण्याची शक्यता आहे. लाडक्या बहिणींना ३ महिन्याचे हप्ते एकत्र दिले जाणार आहेत. येत्या काही दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.