Manasvi Choudhary
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना अजूनही मार्च महिन्याचा हप्ता मिळालेला नाही.
मे महिना सुरू झाला तरी महिलांच्या खात्यात मार्चचे पैसे खात्यात जमा झाले नाही.
मार्चचा हप्ता मिळाला नसल्याने एप्रिल आणि मेचा हप्ता महिलांच्या खात्यात एकत्र जमा होणार की काय? असा प्रश्न महिलांना पडला आहे.
मागील बरेच लाडक्या बहिण योजनेचे पैसे महिलांना एकत्र मिळाले आहेत. यामुळे आता मार्च- एप्रिल आणि मेचे पैसे एकत्र येतील अशी अपेक्षा आहे.
मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसल्याने लाडकी बहिणींच्या लाभार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु होती. अजूनही हे पैसे जमा झालेले नाही.
त्यामुळे आता महिलांना फक्त मार्चचे १५०० रुपये की दोन महिन्याचे ३००० रुपये की मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले.