भारतातील सर्वात लांब पल्ल्याची राजधानी एक्सप्रेस, ४२ तासांत २८४३ किमी अंतर कापणार; महाराष्ट्रासह ६ राज्यातून धावणार

Longest Rajdhani Express Route In India Distance And Time: भारतातील सर्वात लांब पल्ल्याची तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस तब्बल २८४३ किमी अंतर ४२ तासांत पूर्ण करते.
India’s longest Rajdhani Express connecting Delhi to Thiruvananthapuram covers 2,843 km in around 42 hours.
India’s longest Rajdhani Express connecting Delhi to Thiruvananthapuram covers 2,843 km in around 42 hours.saam tv
Published On

भारतीय रेल्वेच्या ताफ्यातील राजधानी एक्सप्रेस गाड्या त्यांच्या वेगवान प्रवास, सुरक्षितता आणि प्रीमियम सेवांसाठी ओळखल्या जातात. मात्र, याच गाड्यांपैकी एक ट्रेन अशी आहे, जिने आपल्या लांबी आणि अंतराच्या बाबतीत मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ही ट्रेन तब्बल 2,843 किलोमीटरचे अंतर साधारण 42 तासांत पूर्ण करते.

India’s longest Rajdhani Express connecting Delhi to Thiruvananthapuram covers 2,843 km in around 42 hours.
Tamil Nadu Accident: पर्यटकांची कार दरीत कोसळली, ९ जणांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

तिरूवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस

भारतीय रेल्वेच्या नेटवर्कमध्ये राजधानी एक्स्प्रेसला सर्वोच्च प्राथमिकता दिली जाते. यामध्ये तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस (ट्रेन नंबर १२४३१/१२४३२) ही देशातील सर्वात लांब पल्ल्याची राजधानी एक्सप्रेस मानली जाते. ही ट्रेन केवळ अंतरच कापत नाही, तर एकाच मार्गावर भारताच्या विविधतेला जोडण्याचे काम करते.

India’s longest Rajdhani Express connecting Delhi to Thiruvananthapuram covers 2,843 km in around 42 hours.
Pune Train : पुण्याहून नागपूरला जायचं टेन्शन संपलं, समर स्पेशल ट्रेन झाली सुरू; वाचा कुठे थांबणार?

दिल्ली ते केरळ: एक अविस्मरणीय प्रवास

ही ट्रेन नवी दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्थानकापासून सुरू होऊन केरळची राजधानी तिरूवनंतपुरम सेंट्रल पर्यंत धावते. उत्तर भारताला दक्षिण भारताशी जोडणाऱ्या या ट्रेनचा प्रवास 42 तासांचा आहे. इतका मोठा प्रवास करणारी ही एकमेव राजधानी एक्सप्रेस आहे.

India’s longest Rajdhani Express connecting Delhi to Thiruvananthapuram covers 2,843 km in around 42 hours.
Maharashtra Elections: मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा धुरळा उडणार, विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक

या प्रवासादरम्यान ही ट्रेन भारतातील ७ मोठ्या राज्यांतून जाते

१. राजस्थान

२. मध्य प्रदेश

३. गुजरात

४. महाराष्ट्र

५. गोवा

६. कर्नाटक

७. केरळ

या प्रवासामुळे प्रवाशांना भारताची विविध भाषा, संस्कृती, हवामान आणि भूगोल जवळून अनुभवता येतो. उत्तर भारतातील वाळवंटापासून ते दक्षिण भारतातील हिरवळीपर्यंतचा हा प्रवास एखाद्या चालत्या फिरत्या चित्रासारखा वाटतो.

वेळापत्रक आणि वैशिष्ट्ये

वेळ: 'इंडिया रेल इन्फो'नुसार, ही ट्रेन हजरत निजामुद्दीनवरून सकाळी ६:१६ वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११:३५ वाजता तिरुवनंतपुरम येथे पोहोचते. राजधानी एक्सप्रेस असल्याने या ट्रेनला रेल्वे मार्गावर सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. कमी थांबे आणि वेगवान स्पीड यामुळे ही ट्रेन वेळेवर पोहोचण्यासाठी ओळखली जाते.

सुविधा: प्रीमियम दर्जाचे जेवण, स्वच्छ डबे आणि उत्तम सेवा यामुळे लांबचा प्रवास असूनही प्रवाशांचा कल या ट्रेनकडे अधिक असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com