Rashmika Mandanna SAAM TV
मनोरंजन बातम्या

Rashmika Mandanna : 'छावा'नंतर रश्मिका घेणार रिटायरमेंट? ट्रेलर लाँचवेळी व्यक्त केल्या भावना, म्हणाली...

Rashmika Mandanna Retirement : 'छावा' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाने आपल्या भावना व्यक्त केल्या. ट्रेलर दरम्यान रश्मिका खूप भावुक झाली होती. नेमकं ती काय म्हणाली, जाणून घ्या.

Shreya Maskar

सध्या सोशल मीडियावर विकी कौशलच्या 'छावा' (chhaava) चित्रपटाची हवा पाहायला मिळत आहे. काल 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. या ट्रेलर रिलीजला दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि बॉलिवूड अभिनेता विकी कौशल उपस्थित होता. 'छावा' चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे.

रश्मिका मंदानाच्या (Rashmika Mandanna) पायाला दुखापत झाली असूनही रश्मिका मंदाना ट्रेलर लाँचला उपस्थित राहिली. रश्मिका ट्रेलर लाँच सोहळ्यासाठी हैदराबादहून प्रवास करून मुंबईत आली. रश्मिकाने ट्रेलर लाँचच्या वेळी आपल्या महाराणी येसूबाईंची भूमिकेबद्दल भावना व्यक्त केल्या. तिच्या बोलण्याने सर्वच भारावून गेले.

रश्मिका मंदाना म्हणाली की, "मला आयुष्यात एकदा तरी अशी भूमिका करायची होती. त्यामुळे मला ही संधी गमवायची नव्हती. माझ्या आयुष्यातील हा सर्वात खास सिनेमा आहे. माझ्या पायाला दुखापत झाली असूनही मी फक्त या सिनेमाच्या ट्रेलर लाँचसाठी हैद्राबाद ते मुंबई प्रवास केला आहे. मला ही संधी सोडायची नव्हते. मला काहीही करून यायचेच होते. मी ही भूमिकेल्या न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. मला नाही माहित की, लक्ष्मण सरांनी माझ्यात काय पाहिले. मी तुमच्या कुटुंबाचा भाग झाले आहे. "

शेवटी रश्मिका मंदाना म्हणाली की, "दाक्षिणात्य अभिनेत्रीला महाराणी येसूबाईची भूमिका साकारायला देणे ही खूप खास गोष्ट आहे. मी लक्ष्मण सरांना बोली होती की, महाराणी येसूबाईची भूमिका केल्यानंतर मी आनंदाने निवृत्ती घेईन. मी रडणारी व्यक्ती नाही. पण हा ट्रेलर पाहून मी खूप भावुक झाली आहे." धमाकेदार ट्रेलर पाहून चाहते 'छावा' चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधींची पत्रकार परिषद सुरू

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून गूड न्यूज! ५ हजार रुपये मदतीसह कर्जमाफीबाबत महत्त्वाचे ८ मोठे निर्णय

PM Kisan Yojana: दसरा की दिवाळी? शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2,000 कधी जमा होणार? PM किसानच्या हप्त्यावर अपडेट समोर

मोठी बातमी! रोहित शर्मा पुन्हा होणार मुंबईचा कर्णधार, हार्दिक पांड्याचा पत्ता कट होणार?

High cholesterol: ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल वाढलंय? दोन्ही समस्यांवर तूप ठरेल रामबाण उपाय, जाणून घ्या पद्धत

SCROLL FOR NEXT