Mumbai Metro Rail : मुंबई मेट्रो मार्ग- 4 वडाळा - कासारवडवलीच्या खर्चात 1274.80 कोटींची वाढ, नेमकं कारण काय?

Mumbai Metro Line 4 : मुंबई मेट्रो मार्ग- 4 वडाळा - कासारवडावलीच्या स्थापत्य काम खर्चात 1274.80 कोटींची लक्षणीय वाढ झाली आहे. या मार्गामध्ये एकूण मार्गामध्ये 30 स्थानके आहेत.
 Mumbai Metro Line
Mumbai Metro Saam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई मेट्रो मार्ग-4 (वडाळा - कासारवडावली) प्रकल्पामध्ये स्थापत्य कामात झालेली तब्बल 1274.80 कोटी रुपयांची वाढ आणि 5 वर्षांची प्रकल्प दिरंगाई हा मुंबईच्या विकासासाठी मोठा धक्का आहे. आरटीआयच्या माध्यमातून आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उघड केलेल्या या माहितीने एमएमआरडीएच्या मेट्रो प्रशासनातील हलगर्जीपणा आणि प्रकल्प व्यवस्थापनातील कमतरता यावर प्रकाश टाकला आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेकडे विविध माहिती विचारली होती. मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेने अनिल गलगली यांना सविस्तर माहिती दिली. मुंबई मेट्रो मार्ग- 4 वडाळा - कासारवडावलीचे काम RInfra- ASTALDI आणि CHEC- TPL या कंपनीला 12 एप्रिल 2018 रोजी देण्यात आले होते. वडाळा ते कासारवडवली मेट्रो मार्ग 4 हा 32.32 किमी लांबीचा उन्नत मार्ग असून, सदर मार्गामध्ये एकूण 30 स्थानके आहेत. सदर काम जुलै 2021 रोजी पूर्ण करणे अपेक्षित होते. आता नवीन डेडलाईन ही ऑगस्ट 2026 अशी आहे.

 Mumbai Metro Line
Mumbai : मुंबईत 'पुष्पा'ला बेड्या, रेल्वेतून लाल चंदनाच्या तस्करीचा गेम फसला

दंडात्मक कारवाईचा अभाव :

अनिल गलगली यांनी प्रकल्पाच्या खर्च वाढीमुळे आणि वेळेत काम पूर्ण न होण्यामुळे दंडात्मक कारवाईची मागणी केली आहे. मुंबई मेट्रो मार्ग- 4 वडाळा - कासारवडावली प्रकल्पाचा स्थापत्य कामाचा अपेक्षित खर्च हा 2632.25 कोटी इतका होता. आता यात 1274.80 कोटींची लक्षणीय वाढ झाली आहे. खर्चात वाढ आणि 5 वर्षांची दिरंगाई लक्षात घेता दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते पण दुर्दैवाने अद्यापही दंडात्मक कारवाई करण्यात आली नाही.

 Mumbai Metro Line
Mumbai Water Cut: मुंबईत पाणीबाणी, तानसा जलवाहिनीला गळती; भांडूप, धारावीसह अनेक भागातील पाणीपुरवठा खंडित!
 Mumbai Metro Line
Mumbai Crime: धक्कादायक! अंघोळ करतानाचा व्हिडीओ काढला, व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार, २ मुलींचाही विनयभंग

हा मार्ग सध्याच्या ईस्टर्न एक्स्प्रेस रोडवे, मध्य रेल्वे, मोनोरेल, सध्या सुरू असलेला मेट्रो मार्ग 2ब(डी एन नगर ते मंडाळे), मेट्रो मार्ग 5 (ठाणे ते कल्याण), मेट्रो मार्ग 6 (स्वामी समर्थनगर ते विक्रोळी) यांच्यात परस्पर जोडणी प्रदान करेल. तरीसुद्धा अश्या महत्वाच्या प्रकल्पात झालेली दिरंगाई ही मुंबईकरांच्या सेवेच्या दृष्टीने घातक असल्याचे मत अनिल गलगली यांनी व्यक्त केली आहे. खर्च वाढीबाबत गलगली यांनी सरकारकडे आणि एमएमआरडीएकडे उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com