Rashmika Mandanna: 'स्वराज्याची शान महाराणी येसूबाई'; रश्मिकाचा 'छावा' चित्रपटातील नवा लूक पाहिलात का ?

Rashmika Mandanna Chhaava Movie: लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपटातील महाराणी येसूबाईच्या भूमिकेत रश्मिका मंदानाने तिचा पहिला लूक शेअर केला.
Rashmika Mandanna Chhaava Movie
Rashmika Mandanna Chhaava MovieInstagram
Published On

Rashmika Mandanna: रश्मिका मंदान्ना सध्या तिच्या आगामी 'छावा' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी करत आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असताना, अभिनेत्रीने आता लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'महाराणी येसूबाई' चित्रपटातील तिच्या पहिल्या लूकचे सोशल मीडियावरून शेअर केला आहे.

रश्मिका मंदान्नाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर चित्रपटातील तिच्या 'महाराणी येसूबाई' लूकचे पोस्टर शेअर केले. पोस्टरमध्ये, रश्मिका पारंपारिक दागिन्यांसह नऊवारी साडी परिधान केलेल्या लुकमध्ये दिसत आहे. एका पोस्टरमध्ये रश्मिका हसत आहे, तर दुसऱ्या पोस्टरमध्ये ती अस्वस्थ आणि तणावग्रस्त दिसत आहे.

Rashmika Mandanna Chhaava Movie
Fussclass Dabhade: आधी हळद, मग लग्न, आता गोंधळ; 'फसक्लास दाभाडे' मधील ‘तोड साखळी’ गाणं प्रदर्शित…

“प्रत्येक महान राजामागे, अतुलनीय शक्तीची राणी उभी असते. "महाराणी येसूबाई - स्वराज्याची शान," असे रश्मिकाने तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. तसेच तिने तिच्या चाहत्यांना आठवण करून दिली आहे की छावा चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच २२ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

Rashmika Mandanna Chhaava Movie
Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी विकला आलिशान अपार्टमेंट; १६८% पेक्षा जास्त झाला नफा, किती मिळाले पैसे?

छावा हा एक ऐतिहासिक नाट्य आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात, विकी कौशल स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. चित्रपटात अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.छावा हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com