Son of Sardaar 2 SAAM TV
मनोरंजन बातम्या

मृणाल ठाकूर नाही, तर Son of Sardaar 2 मध्ये अजय देवगण 'या' अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स

Neeru Bajwa : अजय देवगणचा 'सन ऑफ सरदार 2' आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मृणाल ठाकूरसोबत अजून एक अभिनेत्री झळकणार आहे.

Shreya Maskar

बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगण अलिकडे त्याच्या 'रेड 2' (Raid 2) चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत होता. 'रेड 2'ला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. आता अजय देवगण एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार' या चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते 'सन ऑफ सरदार 2'(Son Of Sardar 2) साठी खूपच उत्सुक आहेत. आता या चित्रपटासंबंधित मोठी अपडेट समोर आली आहे.

अजय देवगणचा 'सन ऑफ सरदार 2' चित्रपटात भरपूर ॲक्शन, कॉमेडी आणि ड्रामा पाहायला मिळणार आहे. 'सन ऑफ सरदार 2' हा 2012 साली रिलीज झालेल्या 'सन ऑफ सरदार'चा सीक्वल आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत मृणाल ठाकूर देखील झळकणार आहे. चाहते या दोघांना एकत्र पाहण्यासाठी खूप आतुर आहेत. मात्र मीडिया रिपोर्टनुसार, 'सन ऑफ सरदार 2'मध्ये बॉलिवूडच्या अजून एका अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. 'सन ऑफ सरदार 2'मध्ये अजय देवगणच्या पत्नीची भूमिकेत अभिनेत्री नीरू बाजवा पाहायला मिळणार आहे.

'सन ऑफ सरदार 2'

'सन ऑफ सरदार 2'मध्ये अजय देवगण, मृणाल ठाकूर , नीरू बाजवा यांच्यासोबत अजून कलाकार पाहायला मिळणार आहेत. यात विंदू दारा सिंह, रवी किशन आणि शरत सक्सेना यांचा समावेश आहे. 'सन ऑफ सरदार 2'मध्ये मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

'सन ऑफ सरदार 2' रिलीज डेट

अजय देवगणचा 'सन ऑफ सरदार 2' हा फुल कॉमेडी चित्रपट 25 जुलै 2025 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नीरू बाजवा वर्कफ्रंट

अभिनेत्री नीरू बाजवान आजवर अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका केल्या आहेत. ती पंजाबी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. चाहते आता नीरू बाजवाला अजय देवगणसोबत पाहायला उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सैराट! प्रेमप्रकरणातून दोघे फरार, भावानं रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीचं मुंडन करत संपवलं; दाजीचाही जीव घेतला

Maharashtra Live News Update: जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेना ठाकरे गटाचा जन आक्रोश मोर्चा

Soldier Death : गुढे येथील जवानाला पश्‍चिम बंगालमध्ये वीरमरण; कुटुंबीयांचा आक्रोश

Janaakrosh Aandolan: क्रीडा मंत्री कुठे? रमी मंत्री इथे!, उद्धव ठाकरेंचा माणिकराव कोकाटेंवर हल्लाबोल|VIDEO

Angarak Sankashti : अडचणी दूर, भाग्य उजळेल! अंगारकी संकष्टी चतुर्थी चतुर्थीला हे ३ उपाय चुकवू नका

SCROLL FOR NEXT