Raid 2 Box Office Collection: अजय देवगण आणि रितेश देशमुखच्या 'रेड 2'ची यशस्वी घोडदौड सुरूच; बॉक्स ऑफिसवर रचला नवा विक्रम

Raid 2 Box Office Collection: अजय देवगनच्या 'रेड 2' या क्राईम थ्रिलर चित्रपटाने आपल्या प्रदर्शनाच्या २५ व्या दिवशी भारतात मोठी कमाई केली आहे.
Raid 2 Box Office Collection Day 16
Raid 2 Box Office CollectionSAAM TV
Published On

Raid 2 Box Office Collection: अजय देवगनच्या 'रेड 2' या क्राईम थ्रिलर चित्रपटाने आपल्या प्रदर्शनाच्या २५ व्या दिवशी भारतात १६२.१० कोटी रुपयांची कमाई केली आहे. राज कुमार गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटात देवगनने पुन्हा एकदा आयआरएस अधिकारी अमय पटनाईकची भूमिका साकारली असून, त्याच्या समोर रितेश देशमुख आणि वाणी कपूर प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.

सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या अहवालांनुसार, 'रेड २' ने रविवारी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर २.४० कोटी रुपये कमावले आहेत. अशा परिस्थितीत, आता त्याचे एकूण संकलन १६२.१० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. 'रेड 2' ही २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रेड' या हिट चित्रपटाची सिक्वेल आहे. या चित्रपटात अमय पटनाईक एका भ्रष्ट राजकारणीवर छापा टाकण्याच्या मिशनवर आहे. चित्रपटाच्या कथानकाने आणि अजय देवगनच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यातच त्याने १०० कोटींचा टप्पा पार केला होता, ज्यामुळे अजय देवगनच्या करिअरमधील हा १५ वे १०० कोटी क्लबमधील चित्रपट ठरला आहे.

Raid 2 Box Office Collection Day 16
Actor Passes Away: १०० हून अधिक चित्रपटात काम करणारे प्रसिद्ध अभिनेते काळाच्या पडद्याआड; मूळ गावी घेतला अखेरचा श्वास

चित्रपटाच्या तिसऱ्या आठवड्यातही 'रेड 2' ने चांगली कामगिरी केली आहे. त्याने तिसऱ्या आठवड्यात २० कोटी रुपयांची कमाई केली असून, एकूण कमाई १५६.८५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या चित्रपटाने अजय देवगनच्या 'टोटल धमाल' या चित्रपटाच्या कमाईचा रेकार्ड ब्रेक करत पाचव्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा मान मिळवला आहे.

Raid 2 Box Office Collection Day 16
Traditional Saree: वट पौर्णिमेला परिधान करा 'ही' कम्फर्टेबल साडी, तुम्हीच दिसलं सगळ्यांमध्ये उठून

'रेड 2' च्या यशामुळे अजय देवगनचा स्टारडम पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. चित्रपटाच्या यशामुळे 'रेड' फ्रँचायझीची लोकप्रियता वाढली असून, प्रेक्षक आता 'रेड 3' ची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या यशामुळे बॉक्स ऑफिसवर अजय देवगनचा दबदबा कायम राहिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com