Actor Passes Away: १०० हून अधिक चित्रपटात काम करणारे प्रसिद्ध अभिनेते काळाच्या पडद्याआड; मूळ गावी घेतला अखेरचा श्वास

Actor Gopal Rai Passes Away: भोजपुरी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गोपाल राय यांचे २५ मे २०२५ रोजी वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले.
Actor Gopal Rai Passes Away
Actor Gopal Rai Passes AwaySaam Tv
Published On

Actor Passes away: भोजपुरी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गोपाल राय यांचे २५ मे २०२५ रोजी वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातील मधौल गावात राहणारे राय हे गेल्या काही वर्षांपासून आजारी होते आणि त्यांनी आपल्या मूळ गावीच शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण भोजपुरी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

गोपाल राय यांनी आपल्या ३८ वर्षांच्या कारकिर्दीत १०० हून अधिक भोजपुरी चित्रपटांमध्ये अभिनय केला. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९८७ साली 'गंगा किनारे मोरा गाव' या चित्रपटात सहाय्यक कॅमेरामन म्हणून केली होती. नंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आणि 'नदिया के पार', 'निरहुआ हिंदुस्तानी', 'राजा जानी' आणि 'चॅलेंज' यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. त्यांनी दिनेशलाल यादव (निरहुआ), पवन सिंग आणि खेसारी लाल यादव यांसारख्या सुपरस्टार्ससोबतही काम केले आहे.

Actor Gopal Rai Passes Away
Traditional Saree: वट पौर्णिमेला परिधान करा 'ही' कम्फर्टेबल साडी, तुम्हीच दिसलं सगळ्यांमध्ये उठून

गोपाल राय हे त्यांच्या सादगीपूर्ण आणि प्रभावी अभिनयासाठी ओळखले जात होते. त्यांनी मुख्यतः सहायक आणि खलनायकाच्या भूमिका साकारल्या, परंतु त्यांच्या अभिनयातील सहजता आणि भोजपुरी भाषेवरील प्रभुत्वामुळे ते प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिले. त्यांना भोजपुरी रत्न पुरस्कार आणि बिहार फिल्म अवॉर्डसारख्या अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.

Actor Gopal Rai Passes Away
The Great Indian Kapil Show: अतरंगी गँगसोबत परतणार कपिल शर्मा; या दिवसापासून सुरु होणार द ग्रेट इंडियन कपिल शो' तिसरा सीझन

गोपाल राय यांचे अंतिम संस्कार २६ मे रोजी रेवा घाट, मुजफ्फरपूर येथे करण्यात आले आहे. भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि चाहत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या जाण्याने भोजपुरी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com