Shruti Vilas Kadam
महाराष्ट्रातील पैठण येथे बनणारी ही साडी रेशीम व सोनेरी झर्याने विणली जाते. मोराच्या आकृत्या, कमळ फुले आणि पारंपरिक डिझाईन्स ही याची वैशिष्ट्ये आहेत.
तमिळनाडूतील कांजीपुरम येथे तयार होणारी ही रेशमी साडी आपल्या चमकदार रंगसंगती व बारीक झर्याच्या डिझाइन्ससाठी ओळखली जाते. ह्या साड्यांचे आयुष्य खूपच जास्त असते.
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे तयार केली जाणारी ही साडी रेशीमपासून बनवली जाते आणि तिच्यावर सोन्याच्या किंवा चांदीच्या झर्या असलेले जड जरी वर्क असते. विशेषतः लग्नसमारंभासाठी प्रसिद्ध आहे.
मध्य प्रदेशातील चंदेरी येथे तयार होणारी ही साडी खूपच हलकी व पारदर्शक असते. रेशीम व सूत यांच्या मिश्रणापासून बनलेली ही साडी सौम्य व नाजूक लुकसाठी ओळखली जाते.
पश्चिम बंगालमधील ही सूताची साडी उन्हाळ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. हलकी, स्वस्त आणि रंगीत प्रिंट्समुळे ही सर्वसामान्य महिलांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
गुजरात व राजस्थान येथील ही साडी ‘टाय अँड डाय’ तंत्राने रंगवली जाते. विविध ठिपक्यांचे व रंगसंगतीचे नक्षीकाम ही याची खासियत आहे.
राजस्थानच्या कोटा शहरातील ही साडी हलक्या सूत व रेशीम मिश्रणाची बनलेली असते. तिच्यावर असलेली चौकटीसारखी ‘चेक्स’ डिझाईन हे खास वैशिष्ट्य आहे.