Indrayani Marathi Serial Update
Indrayani VideoSAAM TV

Indrayani Video: इंदूला मिळणार का अधूची साथ? पाहा 'इंद्रायणी' मालिकेत पुढे काय घडणार

Indrayani Marathi Serial Update : 'इंद्रायणी' मालिकेत अधू आणि इंदूच्या लग्नानंतर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. लवकरच आनंदीबाईंना इंदू आणि गोपाळच्या नात्याचे समजणार आहे. मालिकेत पुढे काय होणार, जाणून घेऊयात.
Published on

'इंद्रायणी' (Indrayani ) मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या मालिकेत इंदू आणि अधूच्या लग्नानंतर नवीन वळण आले आहे. एका बाजूला इंदू तिच्या संसारात आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूला अधूच्या रुसव्याने तिचं मन अस्थिर झालं आहे. या सगळ्याच्या मध्यावर गोपाळ आणि आनंदीबाईंच्या कुरघोड्या, डावपेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

इंदू आणि अधूनी लग्नात दिलेले आव्हानं इंदू विसरू शकली नाहीये. गोपाळ आणि तिचे एकमेकांवर प्रेम होते हे अधूला कळताच त्याला खूप मोठा धक्का बसला आणि त्या दिवसापासून अधू इंदूवर नाराज आहे. आता इंदू आणि अधू देवदर्शनासाठी चांदवड येथे रेणुका आईच्या दर्शनासाठी निघाले आहेत. मंदिरात इंदूने अधू आणि तिच्यातील दुरावा कायमचा मिटावा म्हणून देवीला साकडं घातले. पण अधूला ज्या गोष्टीची भीती होती तेच घडले आहे. गोपाळ आणि इंदूच्या नात्याचे सत्य आनंदीबाईं समोर आले.

आनंदीबाई इंदूला चारित्र्यहीन असं म्हणतात. तेव्हा अधू आनंदीबाईंना खडसावून बोलतो की, "माझ्या बायकोच्या चारित्र्यावर संशय घेतलेला मला चालणार नाही" आता मालिका खूपच रंजक वळणार येऊन ठेपली आहे. अधू आणि इंदूच्या नात्यामधील दुरावा इंदू कसा मिटवणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. देवदर्शनाच्या निमित्ताने देवीच्या चरणी जाऊन इंदू एकच मागणी करते "अधूचं माझ्यावरचं प्रेम पुन्हा मिळविण्याची ताकद मला दे"

अधूने इंदूची साथ तर दिली पण तो तिला माफ करू शकेल का? हे 22 जूनला 'इंद्रायणी' मालिका दुपारी 1 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर पाहता येणार आहे.

Indrayani Marathi Serial Update
Ashok Mama: अशोक मामांनी घेतला मोठा निर्णय; राधा मामी अन् किशा मामाला काढणार घराबाहेर, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com