Siddhi Hande
बॉलिवूड आणि टॉलिवूड चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर.
मृणाल ठाकूरचा सीता रामम हा चित्रपट सर्वांनाच आवडतो.
मृणाल ठाकूर जरी बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करत असली तरीही ती मराठी आहे.
मृणालचा जन्म हा महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील आहे.
मृणालचा जन्म १ ऑगस्ट १९९२ रोजी झाला.
मृणालने आपले शालेय शिक्षण जळगावला पूर्ण केले. त्यानंतर ती मुंबईत आली.
मृणाल नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते. ती नेहमी वेगवेगळ्या भूमिका साकारत असते.
मृणालने कुमकुम भाग्य या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.