Singer Rihanna  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Firing Case: प्रसिद्ध गायिकेच्या घरावर दिवसाढवळ्या गोळीबार, महिलेने धाडधाड १० गोळ्या झाडल्या

Firing On Singer Rihanna House: हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रिहानाच्या घरावर गोळीबार करण्यात आला. दिवसाढवळ्या एका महिलेने धाडधाड १० गोळ्या झाडल्या. या गोळीबारामुळे खळबळ उडाली आहे. पोलिस तपास करत आहेत.

Priya More

Summary:

  • गायिका रिहानाच्या घरावर गोळीबार.

  • लॉस एंजेलिसमधील बेवर्ली हिल्समध्ये रिहानाच्या घरावर हल्ला

  • ३० वर्षांच्या महिलेने गोळीबार केल्याची माहिती

  • आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली

हॉलिवूडची प्रसिद्धी गायिका रिहानाच्या घरावर गोळीबार करण्यात आला. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील बेवर्ली हिल्स येथे ही घटना घडली. ३० वर्षांच्या एका महिलेने सुमारास गायिकेच्या घरावर एक- दोन नाही तर तब्बल १० गोळ्या धाडधाड झाडल्या. ही घटना घडली त्यावेळी गायिका घरामध्येच होती. ही घटना ८ मार्चला दुपारच्या सुमारास घडली. सुदैवाने या गोळीबारामध्ये गायिका रिहानाला काही झाले नाही. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

लॉस एंजेलिस टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. गोळीबारानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गोळीबारानंतर लगेचच पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. त्यानंतर पोलिसांनी त्याच ठिकाणी एका संशयित महिलेला ताब्यात घेतले. या महिलेनेच हा गोळीबार केला असल्याचे समोर आले.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी महिला आपल्या कारमध्ये होती. तिने कारच्या आतूनच रिहानाच्या घरावर गोळीबार केला. त्यानंतर ती घटनास्थळावरून फरार झाली. प्रत्यक्षदर्शिने सांगितले की, महिला पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये होती आणि तिने रिहानाच्या घरावर १० गोळ्या झाडल्या. या महिलेने कारमध्ये बसूनच रिहानाच्या घरावर गोळ्या झाडल्या.

३८ वर्षीय रिहाना तिचा पार्टनर रॉकी आणि ३ मुलांसह राहते. गोळीबाराची घटना घडली त्यावेळी ती घरामध्ये होती. या गोळीबाराच्या घटनेनंतर रिहानाचे चाहते चिंतेत आले होते. पण ती सुरक्षित असल्याचे कळताच त्यांना दिलासा मिळाला. या गोळीबारामध्ये कुणीही जखमी झाले नाही. आरोपी महिलेने रिहानाच्या घरावर गोळीबार का केली? या मागचे कारण काय आहे याचे कारण उघड झाले नाही. लॉस एंजेलिस पोलिस या प्रकरणाच तपास करत आहेत. रिहानाने देखील या घटनेवर अद्याप अधिकृत विधान केले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv Crime: जमिनीच्या वादानं आणलं भावकीत वैर; चुलत्यानं २१ वर्षीय पुतण्याला संपवलं

Maharashtra News Live Update:भोंदू राजेंद्र गडगे याला घेऊन पोलिस पोहचले दत्तधाम आश्रमात...

Fatty Liver Detox: काय सांगता? दारु न पिताही लिव्हर होतो खराब, 'या' ७ घातक सवयी कारणीभूत ठरतात

Crime News: महिलेने घेतला तरूणाच्या प्रायव्हेट पार्टचा चावा; घरी पोहोचताच व्यक्तीचा मृत्यू

५ कोटींच्या MDMA गोळ्या जप्त, महिला सप्लायर अटकेत; मुंबईत खळबळ

SCROLL FOR NEXT