2 माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंडाची शिक्षा, भ्रष्टाचाराविरोधात भारतात कडक कायदे कधी?

Death Penalty for Corruption: भ्रष्टाचारी मंत्र्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. साऱ्या जगभरात या शिक्षेबाबत जोरदार चर्चा सुरू झालीय. नेमक्या कोणत्या मंत्र्यांना आणि कुठं ही कठोर शिक्षा देण्यात आलीय.
China takes strict action against corruption as two former defense ministers face death penalty.
China takes strict action against corruption as two former defense ministers face death penalty.saam tv
Published On

चीनमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांची आता खैर नाही, हेच जिनपिंग यांनी जगाला दाखवून दिलंय. कारण सामान्य नागरिक असो किंवा मंत्री. तिथं भ्रष्टांना संपवण्यासाठी फक्त फाशीच देण्यात येणार आहे. चीनने भ्रष्टाचारी माजी मंत्र्यांना दिलेल्या कठोर शिक्षेनं जगाचं लक्ष वेधून घेतलंय. नेमकं प्रकरण काय आणि शिक्षा दिलीय ते पाहूयात.

चीनमध्ये भ्रष्टाचाराची शिक्षा फक्त फाशी

माजी संरक्षण मंत्री वेई फेंगहे आणि ली शांगफू यांना फाशीची शिक्षा

पदाचा गैरवापर करत लाच घेतल्याचा आरोप

लष्करी न्यायालयाने दोषी ठरवत सुनावली फाशीची शिक्षा

सर्व राजकीय अधिकार रद्द, खासगी मालमत्ताही जप्त

2 वर्षांत पुन्हा बेकायदा कृत्य केल्यास तातडीनं शिक्षेची अंमलबजावणी

चीन मध्ये ३ वर्षांपुर्वी मंत्री असणाऱ्या माजी मंत्र्यांना फाशीची शिक्षा सुनावून जिनपिंग प्रशासनानं देशात भ्रष्टाचाराला थारा नाही हे दाखवून दिलंय..भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षेत कुठलीही सवलत नसून त्यांना पॅरोल देखिल मिळत नाही. मात्र भारतात राजरोसपणे भ्रष्टाचार करून अमाप माया जमवणाऱ्या मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल होतात. जेलमध्य़ेही जातात. मात्र हे नेते पुन्हा राजकारणात सक्रीय होऊन मंत्रिपदावरही विराजमान होतात. कारण सारेच पक्ष सत्तेत आल्यानंतर आपापल्या सोयीचं राजकारण करतात आणि यामुळे भ्रष्टाचाऱ्यांचं फावतं. मात्र चीनच्या या प्रकरणातून आपण काही बोध घेणार का हा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com