सुप्रिया सुळेंनी अपघात झाल्यानंतर ठेवलं स्टेटस अन् प्रवाशांना दिला महत्वाचा संदेश

Supriya Sule Car Accident Mumbai Pune Expressway Details: मुंबई-पुणे महामार्गावर खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीचा अपघात झाला. सुदैवाने सर्वजण सुरक्षित असून त्यांनी नागरिकांना सुरक्षित वाहन चालवण्याचे आणि सीट बेल्ट वापरण्याचे आवाहन केले आहे.
NCP MP Supriya Sule urges road safety after surviving a car accident on the Mumbai-Pune Expressway.
NCP MP Supriya Sule urges road safety after surviving a car accident on the Mumbai-Pune Expressway.saam tv
Published On

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. मुंबई-पुणे मार्गावर हा अपघात झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गाडीमधील सर्वजण सुखरूप आहेत अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. यानंतर रस्त्यावर वाहन चालवतान काळजी घाय असे आवाहन त्यांनी सर्वांना केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मागून येणाऱ्या एका गाडीने सुळे यांच्या कारला धडक दिली. सुदैवाने गाडीतील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

या अपघातात माहिती देताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, आज पुणे ते मुंबई प्रवास करताना महामार्गावर मला एक अत्यंत कटू अनुभव आला. वाहन क्रमांक GJ 13 CF 5257 ने माझ्या गाडीला बाजूने जोरदार धडक दिली. सुदैवाने सर्वजण सुखरूप आहेत.

NCP MP Supriya Sule urges road safety after surviving a car accident on the Mumbai-Pune Expressway.
VIjay Shivtare | Shivsena शिस्तपालन समितीकडून शिवतारेंना नोटीस, 24तासांत उत्तराचे आदेश |Marathi News

अपघातानंतर इतर प्रवाशांना दिला महत्वाचा संदेश

सुप्रिया सुळे यांनी व्हाट्सअप स्टेटस आणि ट्विट करत म्हणाल्या की=, अशा प्रकारच्या घटना ही एक गंभीर आठवण करून देतात की, आपल्या रस्त्यांवर अतिवेगाने वाहन चालवणे आणि निष्काळजीपणा करणे यामुळे असंख्य लोकांचे जीव धोक्यात येऊ शकतात, मी सर्वांना आवाहन करते की कृपया सीट बेल्ट वापरा आणि सावध राहा आणि जबाबदारीने वाहन चालवा जेणेकरून आपले महामार्ग सर्वांसाठी अधिक सुरक्षित बनतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com