Salman Khan appears visibly tired during a Mumbai event, sparking concern among fans after viral videos surfaced online. saam tv
मनोरंजन बातम्या

चेहऱ्यावर सुरकुत्या, चालण्यात बदल... सलमान खानचा चेहरा पाहून चाहते अस्वस्थ; व्हायरल व्हिडिओ पाहून व्यक्त केली चिंता

Salman Khan health update after Mumbai event: मुंबईतील कार्यक्रमात दिसलेल्या सलमान खानच्या बदललेल्या लूकमुळे चाहत्यांमध्ये चिंता वाढली आहे. व्हायरल व्हिडिओत तो थकलेला आणि अशक्त दिसत असल्याने तब्येतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

Omkar Sonawane

अलीकडेच सलमान खान मुंबईतील एका कार्यक्रमात दिसला आणि त्याचा बदललेला लूक पाहून चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. 60 वर्षांच्या सलमानचा चेहरा थकलेला, सुखलेला दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आणि त्वचा सैल झालेली दिसल्याने चाहते घाबरले आहेत. शुक्रवारी (18 जुलै) सलमान खान Slum Rehabilitation Authority (SRA) च्या कार्यालयात गेला होता. यावेळी त्याने अॅडव्हान्स्ड डेटा कलेक्शन आणि व्हेरिफिकेशन सपोर्ट सेंटर (IT सर्व्हर रूम) चे उद्घाटन केले. तसेच लाभार्थ्यांना घरांच्या चाव्याही सुपूर्द केल्या. मात्र या कार्यक्रमातील त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी त्याच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली.

काही चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना लिहिले की, सलमान आजारी दिसतोय, देव त्याला चांगले आरोग्य देवो. तर काहींनी त्याला काही हेल्थ इश्यू आहे का? असा प्रश्न विचारला. आणखी एका चाहत्याने म्हटले की, चित्रपटात ‘भाई’ एकटाच 50 जणांशी लढतो, पण इथे त्याची चमक दिसत नाही. त्याच्या डोळ्यांत थकवा स्पष्ट दिसतोय.

काही जणांनी तर हा खरंच सलमान खान आहे का? असा प्रश्नही उपस्थित केला. काहींनी तो नीट चालत नाही असेही नमूद केले. मात्र दुसरीकडे काही चाहत्यांनी त्याला पाठिंबा देत सांगितले की, हे वयाचे परिणाम आहेत. सलमानचा आदर केला पाहिजे, त्याची खिल्ली उडवू नये. सध्या सलमान खानच्या तब्येतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Earthquake: मध्यरात्री पालघर भूकंपाने हादरले! तासाभरात भूकंपाचे दोन धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Bhimashankar Temple: श्रावणात भाविकांना मोठा दिलासा; पाच महिन्यांनंतर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर पूर्णवेळ खुलं

Maharashtra News Live Update: पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज तिरंगा रॅलीचे आयोजन

आरोग्य विभागात तब्बल 89 लाखांचा घोळ, अधिकाऱ्याच तडकाफडकी निलंबन

Colombia earthquake: 7.4 तीव्रतेच्या भूकंपाने कोलंबिया हादरलं; 111 जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT