Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीवर मोठे संकट; भर रस्त्यातून आजीला केले किडनॅप, खंडणीचा फोन आला अन्...| VIDEO

Veen Doghantali Hi Tutena marathi serial update : 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत धक्कादायक ट्विस्ट आला आहे. आजीचे अपहरण होते, ज्यामुळे समर-स्वानंदीच्या आयुष्यात मोठे वादळ आले आहे.
Veen Doghantali Hi Tutena marathi serial update
Veen Doghantali Hi Tutena Video SAAM TV
Published On
Summary

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत धक्कादायक ट्विस्ट

समरच्या आजीचे अपहरण

समर-स्वानंदीला खंडणीसाठी येतो फोन

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत रोज नवा ड्रामा पाहायला मिळत आहे. मल्लिका काकू सर्व संपत्तीसाठी समर-स्वानंदीच्या आयुष्यात कट-कारस्थान रचताना दिसते. अंशुमन आणि सुष्मिताच्या लग्नानंतर मल्लिका सुष्मिताचा आधार घेऊन समर-स्वानंदीच्या आयुष्यात नवीन संकटे निर्माण करते. मात्र मल्लिकाचा प्रत्येक प्लान स्वानंदी मोडू काढताना दिसते. अशात मालिकेचा नवीन धक्कादायक प्रोमो समोर आला आहे.

प्रोमो व्हिडीओत नेमकं काय?

समरची आजी बाहेर गेलेली असते. रस्त्यावर चालताना तिला ठेच लागते आणि ती अडखळते. आजी स्वतःला सावरते. तेवढ्यात तिथे दोन बायका मदतीच्या निमित्ताने येतात आणि म्हणतात, "काय झाले आजी?" त्यानंतर त्या बायका आजीला जबरदस्तीने एका व्हॅनमध्ये बसवतात. आजीला बेशुद्ध करतात. एकंदर गुंड आजीला किडनॅप करतात. दुसरीकडे समरला किडनॅपरचा कॉल येतो तो बोलतो की, "तुझी आजी आमच्या ताब्यात आहे आमच्या..." मग समर घाबरून विचारतो की, "कोण बोलताय तुम्ही? तुम्हाला काय हवंय?" त्यावर किडनॅपर बोलतो की, "२५ लाख आणून द्यायचे, नाही तर म्हातारीला इथेच संपवतो..." हे एकूण समर आणि स्वानंदीला मोठा धक्का बसतो.

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेच्या नवीन प्रोमोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "भर दिवसा आजीचं अपहरण होणार!" आता 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेचे येणारे भाग खूपच रंगतदार असणार आहे. समर-स्वानंदी आजीला कसे सोडवणार आणि या मागे नक्की कोण?, स्वानंदी या सर्वाचा कसा छडा लावणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत मुख्य भूमिकेत तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे झळकले आहेत. समर-स्वानंदी हे पात्र त्यांनी साकारले आहे. तर किशोरी अंबिये, शर्मिला शिंदे, राज मोरे, सुलभा आर्य असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या कलाकारांना प्रेक्षक भरपूर प्रेम देत आहेत.

Veen Doghantali Hi Tutena marathi serial update
Aamir Khan: "श्वासही घ्यायला देणार नाही..."; सलमाननंतर आमिर खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर, सोशल मीडियावर धमकी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com