Actress Arrested: डायरेक्टरला किडनॅप करण्यासाठी अभिनेत्रीने रचलं जाळं; अखेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Actress Arrested: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनीशचे अपहरण आणि मारहाण प्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक केली आहे. अभिनेत्रीसह अन्य ११ जणांना देखील अटक करण्यात आली आहे.
Actress Aishwarya Among 11 People Arrested In Director Anish Kidnapping
Actress Aishwarya Among 11 People Arrested In Director Anish KidnappingSaam Tv
Published On

Actress Arrested: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनीशचे अपहरण आणि मारहाण प्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी अभिनेत्री ऐश्वर्या आणि इतर ११ जणांना अटक केली आहे. या धक्कादायक अपहरण आणि मारहाण प्रकरणात, कन्नड चित्रपट दिग्दर्शकाला कार विकण्याचे आमिष दाखवून, अपहरण करून, क्रूरपणे मारहाण करून लुटण्यात आल्याचा आरोप आहे. अडुगोडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी अभिनेत्री ऐश्वर्यासह ११ आरोपींना अटक केली आहे.

पीडित, दिग्दर्शक अनीश मॉडेलिंग आणि कास्टिंग एजन्सी चालवतो आणि जीवदा भाषा चित्रपटाचे दिग्दर्शन करत होता. तो ९ फेब्रुवारी रोजी मुंबईहून बेंगळुरूला आला होता. तेव्हा त्याला सांगण्यात आले की एका खरेदीदाराला त्याची होंडा सीआरव्हीमध्ये पाहायची आहे. तपासात असे दिसून आले की त्याला शहराच्या बाहेरील एका घरात बोलवण्यात आले होते, जिथे मुख्य आरोपी आशिरवच्या नेतृत्वाखालील एका गटाने त्याच्यावर काठ्यांनी हल्ला केला आणि पैशाच्या व्यवहारांशी संबंधित तक्रारी मागे घेण्याची धमकी दिली.

Actress Aishwarya Among 11 People Arrested In Director Anish Kidnapping
Actress Gold Smuggling Scandal: प्रसिद्ध अभिनेत्रीवर ईडीची कारवाई; १०० कोटी रुपयांच्या गोल्ड स्मगलिंगचा आरोप

लाखो रुपयांची लूट

पीडित, दिग्दर्शकाकडून सोन्याचे दागिने आणि लाखो रुपयांची रोख रक्कम लुटण्यात आले. जबरदस्तीने गाडीत बसवण्यात आले, टोल क्षेत्राजवळ पुन्हा हल्ला करण्यात आला आणि आरोपीने त्याच्या एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांना असाही संशय आहे कीदिग्दर्शकाला ओळखीच्या लोकांनीच आमिष दाखवले होते दिग्दर्शकाला अनेक जखमा झाल्या आहेत आता त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणातील सर्व ११ आरोपींना अटक केली आहे. संपूर्ण कट आणि प्रत्येक संशयिताची चौकशी पोलिस करत आहेत.

Actress Aishwarya Among 11 People Arrested In Director Anish Kidnapping
Rashmika-Vijay Wedding Photo: 'माझी बायको... माझा नवरा...'; रश्मिका-विजयच्या शाही लग्नाचे फोटो व्हायरल

पोलिस तपासात गुंतले

पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे आणि अटक केलेल्या सर्व आरोपींची बारकाईने चौकशी करत आहेत. लवकरच प्रकरणाची सर्व माहिती उघड होईल. लाखो रुपयांच्या दरोडा आणि मारहाणीशी संबंधित हे प्रकरण आता सोशल मीडियावरही चर्चेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com