Famous Actress : एक फोन अन् अकाउंट रिकामे, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईची सायबर फसवणूक

Marathi Actress Mother Victim To Cyber Fraud : मराठी प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईची सायबर फसवणूक झाली आहे. नेमकं घडलं काय, जाणून घ्या.
Marathi Actress Mother Victim To Cyber Fraud
Famous Actresssaam tv
Published On
Summary

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईची सायबर फसवणूक

पुण्यात घडला हा धक्कादायक प्रकार

एका फोननंतर अकाउंटमधून पैसे गेले

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगणा भार्गवी चिरमुले यांच्या आईची फसवणूक करण्यात आली आहे. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.

भार्गवी चिरमुलेच्या आईला एम एन जी एल गॅस कनेक्शन बिलाचा संदर्भाने व्हिडीओ कॉल आला. कॉलरच्या सांगितलेल्या कृतीतून पैशांची फसवणूक झाली. त्यानंतर भार्गवी चिरमुलेच्या आईचे ३५ हजार रुपये त्यांच्या बँकेतून सायबर चोरट्यांनी गायब केले. हा सगळा प्रकार मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात झाला होता. याबाबत सायबर पोलिसात तक्रार केली होती. ही तक्रार वारजे पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली.

वारजे पोलीस ठाण्यातील सायबर पथकाने तांत्रिक विश्लेषण करून, माहिती काढून फसवणूक करणाऱ्यांचे बँक खाते फ्रिज केले. त्यामधील फसवणूक झालेली रक्कम लिन केली. न्यायालयाची कायदेशीर कार्यवाही करून ही रक्कम तक्रारदारांना देण्यात आली. अभिनेत्री भार्गवी चिरमुले आणि त्यांच्या मातोश्री यांनी पोलीस ठाण्यात येऊन रक्कम स्वीकारली आणि पोलीसांचे आभार मानले.

Marathi Actress Mother Victim To Cyber Fraud
Varanasi Movie : डोळ्यात आग अन् चेहऱ्यावर मिश्किल हास्य; 'वाराणसी' चित्रपटातील प्रियांका चोप्राचा नवा लूक समोर | PHOTO

भार्गवी चिरमुले मराठी इंडस्ट्रीतील खूप प्रसिद्ध चेहरा आहे. आजवर तिने अनेक मराठी मालिका, चित्रपट आणि नाटक यांमध्ये काम केले आहे. अलिकडेच तिचे 'एकदा पाहावं करून' हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या नृत्यांने ती चाहत्यांना वेड लावले आहे.

Marathi Actress Mother Victim To Cyber Fraud
Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीवर मोठे संकट; भर रस्त्यातून आजीला केले किडनॅप, खंडणीचा फोन आला अन्...| VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com