Varanasi Movie : डोळ्यात आग अन् चेहऱ्यावर मिश्किल हास्य; 'वाराणसी' चित्रपटातील प्रियांका चोप्राचा नवा लूक समोर | PHOTO

SS Rajamouli Share Priyanka Chopra New Look Out from varanasi Movie : आज देसी गर्ल प्रियंका चोप्राचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास सरप्राइज मिळाले आहे. 'वाराणसी' चित्रपटातील प्रियंकाचा नवा लूक समोर आला आहे.
SS Rajamouli Share Priyanka Chopra New Look Out from varanasi Movie
Varanasi MovieSAAM TV
Published On
Summary

प्रियंका चोप्राचा आज वाढदिवस आहे

प्रियंकाचा 'वाराणसी' चित्रपटातील नवा लूक समोर आला

प्रियंका 'वाराणसी' चित्रपटात साकारणार मंदाकिनीची भूमिका

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राचा आज (18 जुलै) वाढदिवस आहे. गेले काही काळापासून प्रियंका चोप्रा तिचा आगामी चित्रपट 'वाराणसी'मुळे चांगलीच चर्चेत आहे. प्रियांका चोप्राच्या वाढदिवसानिमित्त 'वाराणसी' च्या निर्मात्यांनी म्हणजेच एस. एस. राजामौलींनी चाहत्यांना भन्नाट सरप्राइज दिले आहे. एस. एस. राजामौली यांनी प्रियांका चोप्राचा 'वाराणसी' चित्रपटातील नवीन लूक शेअर केला आहे. जो पाहून चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

एस. एस. राजामौली यांनी नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात प्रियांका चोप्राचे 'वाराणसी' चित्रपटातील दोन लूक दिसत आहे. पहिल्या फोटोत प्रियांका चोप्रा वेर्स्टन काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य आणि डोळ्यात आग पाहायला मिळत आहे. तिचा हा दमदार अवतार खूपच खतरनाक आहे. दुसऱ्या फोटोमध्ये प्रियांका चोप्रा उंच भरारी घेताना दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले की, "हसते तेव्हा सुंदर दिसते नाहीतर एक आग आहे..." या पोस्टवर चाहते आणि कलाकार मंडळी भरभरून कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

प्रियांका चोप्रा 'वाराणसी' चित्रपटात 'मंदाकिनी'ची भूमिका साकारणार आहे. 'वाराणसी' मध्ये प्रियांका चोप्रा महेश बाबू यांच्यासोबत झळकणार आहे. चित्रपटात महेश बाबू 'रुद्रा'च्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. वाराणसीमध्ये महेश बाबू दुहेरी भूमिकेत झळकणार आहे. (नायक रुद्र आणि प्रभू श्री भगवान राम) 'वाराणसी' हा महाकाव्य ॲक्शन चित्रपट आहे. अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन चित्रपटात खलनायकाची (कुंभा) भूमिका साकारणार.

'वाराणसी' चित्रपट ७ एप्रिल २०२७ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रियंका चोप्रा आज 44 वर्षांची झाली आहे. तिने बॉलिवूडसोबतच हॉलिवूड देखील गाजवले आहे. प्रियांका चोप्राने डिसेंबर 2018 रोजी अमेरिकन गायक निक जोनासशी लग्नगाठ बांधली. 2022 मध्ये सरोगसीद्वारे त्यांच्या आयुष्यात बाळ आले. प्रियांका चोप्राच्या मुलीचे नाव मालती मेरी असे आहे.

SS Rajamouli Share Priyanka Chopra New Look Out from varanasi Movie
Famous Actress Death : ऑस्कर विजेत्या प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, मनोरंजन विश्वावर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com