Priyanka Chopra: प्रियांका चोप्रा थोडक्यात वाचली, देसी गर्लसोबत ऑस्करसोहळ्याआधी काय घडलं?

Priyanka Chopra: या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा या सोहळ्यात 'प्रेझेंटर' म्हणून उपस्थित होती. सध्या तिचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, यामध्ये ती एका अपघातातून थोडक्यात बचानाना दिसत आहे.
Priyanka Chopra
Priyanka ChopraSaam Tv
Published On
Summary

प्रियांका चोप्राने ऑस्करमध्ये 'प्रेझेंटर' म्हणून भारताचे प्रतिनिधित्व केले

प्रियांका चोप्रा ऑस्करपूर्वी अपघातातून थोडक्यात बचावली

प्रियांका चोप्रा कोणत्या अपघातातून बचावली?

२०२६ मधील ऑस्करमध्ये भारताच्या वाट्याला काय आले?

Priyanka Chopra: जगातील सर्वात मोठा पुरस्कार सोहळा असलेल्या ऑस्करची ९८वा सोहळा नुकताच पार पडला. या वर्षी Sinners आणि One Battle After Another यांसारख्या चित्रपटांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले; या दोन्ही चित्रपटांनी विविध श्रेणींमध्ये पुरस्कार पटकावले. या वर्षी भारतातून अनेक चित्रपट ऑस्करसाठी 'शॉर्टलिस्ट' करण्यात आले होते. मात्र, त्यापैकी एकाही चित्रपटाला अंतिम नामांकनामध्ये स्थान मिळाले नाही. तरीही, प्रियांका चोप्राने 'प्रेझेंटर' पुरस्कार सादरकर्ती म्हणून उपस्थित लावून भारताचे प्रतिनिधित्व करत या सोहळ्याची शोभा वाढवली.

प्रियांका चोप्रा अपघातातून थोडक्यात बचावली

प्रियांका चोप्रा हिने 'सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म' (Best International Feature Film) श्रेणीतील विजेत्याची घोषणा केली. या सोहळ्यापूर्वी चित्रित करण्यात आलेला एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये ही अभिनेत्री एका अपघातातून थोडक्यात बचावली असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये ती निक जोनासच्या बाजूला बसलेली दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Priyanka Chopra
Dhurandhar 2: 'धुरंधर २'चा जलवा; रिलीजपूर्वीच रणवीर सिंगच्या चित्रपटाची १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री

प्रियांका चोप्रा कोणत्या अपघातातून बचावली?

ऑस्कर सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचण्याचा व्हिडिओ शूट करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्रा एका 'गोल्फ कार्ट'च्या पुढच्या सीटवर बसलेली दिसत आहे, तर निक जोनास आणि इतर दोन प्रवासी मागच्या सीटवर बसलेले आहेत. यावेळी महिला चालक गाडी वळवते, तेव्हा ती गाडी एका बाजूला कलताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसते की, गाडी डाव्या बाजूला प्रियांका बसली होती तिथे मोठ्या प्रमाणात कलली होती. पण गाडीने लगेचच आपला तोल सावरला. जर गाडी डाव्या बाजूला आणखी जास्त कलली असती, तर प्रियांका चोप्रासोबत एक मोठ्या अपघाताला झाला असता.

Priyanka Chopra
Chandrika Dixit Controversy: 'मुलासाठी कुणासोबत झोपावं लागलं तरी…'; बिग बॉस फेम इन्फ्लुएंसरचं धक्कादायक वक्तव्य

२०२६ मधील ऑस्करमध्ये भारताच्या वाट्याला काय आले?

२०२६ बद्दल बोलायचे झाल्यास, भारतातून Homebound, Kantara: Chapter 1, Tanvi the Great आणि Tourist Family यांसारख्या चित्रपट ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले होते. मात्र, यापैकी कोणताही चित्रपट अंतिम नामांकनाच्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकला नाही. दरम्यान, भारतीय-अमेरिकन दिग्दर्शिका गीता गांधभीर यांच्या दोन चित्रपटांना ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते. तरीही, अखेरीस अंतिम टप्प्यावर त्यांनाही निराश व्हावे लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com