Dhurandhar 2: 'धुरंधर २'चा जलवा; रिलीजपूर्वीच रणवीर सिंगच्या चित्रपटाची १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री

Dhurandhar 2 Advance Booking: रणवीर सिंगचा चित्रपट 'धुरंधर २' ॲडव्हान्स बुकिंगमध्ये अत्यंत दमदार कमाई करत आहे. प्रदर्शनाला अजून तीन दिवस बाकी असतानाच, या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगद्वारे आतापर्यंतच ११९ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
Dhurandhar 2
Dhurandhar 2Saam Tv
Published On
Summary

धुरंधर २ची चाहत्यांमध्ये क्रेझ

धुरंधर २ साठी आगाऊ बुकिंग

एकूण 'प्री-सेल्स' कलेक्शन

‘धुरंधर २’ चा रनटाईम

Dhurandhar 2 Advance Booking: आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर २ (Dhurandhar 2) या चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. या फ्रँचायझीचा पहिला भागाने पहिल्या दिवशी केवळ २८ कोटी रुपयांची कमाई केली. मात्र, धुरंधर २ हा चित्रपट पहिल्याच दिवशी ९० ते १०० कोटी रुपयांचे कलेक्शन करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.कारण चित्रपटाची तिकिटे सातत्याने बुक केली जात आहेत,यावरून हे स्पष्ट होते की, या चित्रपटाने खरोखरच प्रेक्षकांच्या मनाचा उत्सुकता वाढवली आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये इतका उत्साह आणि क्रेझ आहे की, प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने ११९ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

धुरंधर २ साठी आगाऊ बुकिंग

धुरंधर २ साठीच्या आगाऊ बुकिंगला १४ मार्च रोजी सुरुवात झाली. 'सॅकनिल्क' (Sacnilk) या संकेतस्थळाच्या माहितीनुसार, १६ मार्च रोजी पहाटे ४:३२ वाजेपर्यंत, चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसासाठीच्या बुकिंगने २२.७० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता यामध्ये ६.१ दशलक्ष तिकिटांचा समावेश आहे. चित्रपट निर्मात्यांनी १८ मार्च रोजी चित्रपटाचे 'पेड प्रिव्ह्यू' शो आयोजित केले आहेत. फक्त या 'पेड प्रिव्ह्यू'मधूनच आतापर्यंत ३७.११ कोटी रुपयांची कमाई चित्रपटाने केली आहे. याव्यतिरिक्त, भारताबाहेर ६० कोटी रुपयांची तिकिटे आधीच विकली गेली आहेत.

Dhurandhar 2
Chandrika Dixit Controversy: 'मुलासाठी कुणासोबत झोपावं लागलं तरी…'; बिग बॉस फेम इन्फ्लुएंसरचं धक्कादायक वक्तव्य

एकूण 'प्री-सेल्स' कलेक्शन

या चित्रपटाने आतापर्यंत 'प्री-सेल्स'मध्ये ११९.८१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अजूनही तीन दिवस बाकी आहेत. त्यामुळे, पुढील तीन दिवसांत हा चित्रपट कमाईचे आणखी कोणते नवीन रेकार्ड मोडणार हे औत्सुक्याचे ठरेल.

Dhurandhar 2
Dhurandhar 2: 'धुरंधर 2'मधील 'बडे साहेब' नेमकं कोण? अखेर उलगडलं; डायरेक्टरनेच केला खुलासा

‘धुरंधर २’ चा रनटाईम

धुरंधर २’ हा जास्त मोठा चित्रपट आहे. पहिल्या भागाचा कालावधी ३ तास ​​३२ मिनिटे इतका होता, तर दुसऱ्या भागाचा कालावधी ३ तास ​​५५ मिनिटे इतका आहे. या चित्रपटाचा ट्रेलर ७ मार्च रोजी प्रदर्शित करण्यात आला आणि प्रेक्षकांकडून त्याला अत्यंत उदंड प्रतिसाद मिळाला. धुरंधर या चित्रपटाने जगभरात १,३०० कोटी रुपयांची कमाई केली होती. आता ‘धुरंधर २’ हा रेकॉर्ड ब्रेक करेल असे चाहत्यांता विश्वास आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com