एसएस राजामौली (SS Rajamouli) पुन्हा एकदा धमाकेदार चित्रपटासोबत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एसएस राजामौली यांच्या आगामी चित्रपट SSMB29 ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात तगडी स्टार कास्ट पाहायला मिळणार आहे. यात साऊथ अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu ) आणि बॉलिवूडची स्टार प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) महत्त्वाच्या भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहेत. एसएस राजामौली यांनी चित्रपटाची अपडेट देत एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांनी महेश बाबू आणि प्रियांका चोप्रा यांच्यासोबतच्या SSMB29 चित्रपटाची घोषणा केली. राजामौली यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांना सिंहाला पिंजऱ्यात कैद केले आहे आणि अभिनेत्याचा पासपोर्टही आपल्या ताब्यात घेतला आहे. याचा अर्थ असा की, अभिनेत्याचा पासपोर्ट दाखवत राजामौली यांनी सिंह (महेश बाबू)ला पिंजऱ्यात कैद केले आहे.
राजामौलीच्या SSMB29 आगामी चित्रपटाबद्दल अद्याप कोणतेही विशेष अपडेट समोर आले नाही. मीडिया रिपोर्टनुसार, SSMB29 चित्रपट ॲक्शन आणि ॲडव्हेंचरचा धमाका असणार आहे. चाहते देखील या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. एसएस राजामौली आणि महेश बाबू यांनी 2 जानेवारीला झालेल्या हैदराबादमध्ये एका विशेष पूजा समारंभात SSMB29 लाँच करण्यात आला. अखेर SSMB29 चित्रपटाचे शूटिंग जानेवारी 2025 मध्ये सुरू झाले म्हणायला हरकत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.