Mahesh Babu : सुपरस्टार महेश बाबू ईडीच्या रडारवर, २७ एप्रिलला हजर राहण्याचे समन्स, नेमकं प्रकरण काय?

Mahesh Babu ED Summons : साऊथचा सुपरस्टार महेश बाबूला मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीनं समन्स बजावले आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.
Mahesh Babu ED Summons
Mahesh BabuSAAM TV
Published On

साउथ सुपरस्टार महेश बाबूच्या (Mahesh Babu) अडचणी वाढल्या आहेत. मनी लाँडरिंग (Money Laundering Case) प्रकरणात ईडीने त्याला समन्स बजावले आहे. महेश बाबूला 27 एप्रिल रोजी हैदराबाद येथील ईडी (ED) कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. साई सूर्या डेव्हलपर्स आणि सुराणा ग्रुप या रिअल इस्टेट कंपन्यांशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात हे समन्स पाठवण्यात आले आहे. महेश बाबू या कंपन्यांच्या ग्रीन मेडोज प्रकल्पाचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, अलीकडेच ईडीने या दोन कंपन्या आणि त्यांच्याशी संबंधित गुंतवणूकदारांवर छापे टाकले होते. साई सूर्याचे मालक सतीश चंद्र गुप्ता यांच्यावर फसवणूक आणि बनावटगिरीचे गंभीर आरोप आहेत. आता ईडी या प्रकरणातील महेश बाबूची चौकशी करत आहे. या प्रकरणात आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, महेश बाबू यांना साई सूर्या डेव्हलपर्सच्या जाहिरातीसाठी एकूण 5.9 कोटी रुपये देण्यात आले होते. यातील 3.4 कोटी रुपये बँकिंग माध्यमातून, तर उर्वरित 2.5 कोटी रुपये रोख स्वरूपात द्यायचे होते. हे रोख रकमेचे व्यवहाराबद्दल आता चौकशी सुरू आहे. अद्याप कोणतीही मोठी माहिती समोर आली नाही आहे.

महेश बाबू आगामी चित्रपट

साऊथ अभिनेता महेश बाबूने आजवर अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. त्याच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. आता लवकरच महेश बाबू SSMB29 चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो याच चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एस.एस. राजामौली करत आहे. या चित्रपटात बॉलिवूडची सुपरस्टार प्रियांका चोप्रा देखील मुख्य भूमिकेत आहे.

Mahesh Babu ED Summons
Isabelle Kaif : कतरिनाची बहीण घेऊन येतेय अनोखी प्रेमकथा, धमाकेदार टीझर पाहिलात?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com