Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18: बिग बॉसच्या घरात पुन्हा मारामारी, अविनाश अन् दिग्विजयमध्ये नेमकं घडलं काय? पाहा VIDEO

Digvijay-Avinash-Rajat Fight: बिग बॉसच्या घरात पुन्हा मारामारी झालेली पाहायला मिळत आहे. अविनाश आणि दिग्विजय राठी यांच्यात नेमकं वादाचे कारण काय जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बिग बॉस 18' मध्ये Bigg Boss 18 ) आपल्याला रोज एक नवीन राडा पाहायला मिळत आहे. आता या गेमने पुन्हा एकदा हिंसेचे रूप घेतले आहे.बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा मारामारी झालेली पाहायला मिळत आहे.

बिग बॉसमध्ये अविनाश, रजत आणि दिग्विजयमध्ये मोठे भांडण झाले. ज्यात अविनाश आणि दिग्विजयने मारामारी केली. बिग बॉसने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अविनाश मिश्रा (Avinash Mishra) आणि रजत दलाल दिग्विजयला (Digvijay Singh Rathee) मारताना पाहायला मिळत आहे. ते दोघे दिग्विजयच्या अंगावर धावून जातात. तसेच अविनाश दिग्विजयचा टी-शर्ट पकडतो. तर गळा पकडून शारीरिक हिंसा करताना पाहायला मिळत आहे.

नेमकं काय घडलं ?

अविनाश, रजत आणि दिग्विजयमध्ये हा वाद ईशामुळे झाला आहे. बिग बॉसने दिलेल्या पार्ले-जी टास्कमध्ये दिग्विजय राठी विजेता झाला. त्यामुळे त्याला पार्ले-जी बिस्किट्स मिळतात. ज्यातून एक बिस्किट ईशा घेते आणि वाद सुरू होता. दिग्विजय ईशाला भडकून म्हणतो की, तू बिस्किट विचारून घे. यावर अविनाश आणि दिग्विजयमध्ये धक्काबुक्की होते. या भांडणांमध्ये पुढे रजत (Rajat Dalal ) पडतो. हा वाद सोडवण्याचा घरातील इतर सदस्य प्रयत्न करतात.

या आठवड्याच्या 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खान (Salman Khan) यांना काय शिक्षा देणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. तर बिग बॉसच्या घरातून कोणाचा पत्ता कट होणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

Gen-Z Podcast Bulletin : टीव्ही विश्वातील पहिलं Gen Z बुलेटिन फक्त साम टीव्हीवर; कधी आणि कुठे-कुठे बघायला मिळणार? वाचा

वनरक्षकालाच वाघानं उचलून नेलं? हल्ला करतानाचा वाघाचा व्हिडिओ?

Mumbai Voter List: मुंबईत मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ; ३५० हून अधिक मतदारांना पत्ताच नाही, मनसेकडून आंदोलनाचा इशारा

Accident : अपघाताचा थरार! भरधाव बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक; दोन्ही वाहनांचा चुराडा

SCROLL FOR NEXT