Digvijay-Avinash Fight
Bigg Boss 18SAAM TV

'Bigg Boss 18'च्या घरात पुन्हा हातापायी; अविनाश-दिग्विजय एकमेकांना भिडले, पाहा VIDEO

Digvijay-Avinash Fight: बिग बॉसच्या घरात दिग्विजय आणि अविनाशमध्ये मोठे भांडण झाले आहे. नेमकं कारण काय जाणून घेऊयात.
Published on

घरात दोन्ही वाइल्ड कार्ड एन्ट्री आपला भन्नाट गेम दाखवत आहे. घरात कोणाशी ना कोणाशी त्यांचे भांडण होताना पाहायला मिळत आहे. रेशन वरून कशिश आणि विवियनमध्ये मोठे भांडण झाले. तसेच आता अविनाश (Avinash Mishra) आणि दिग्विजय मध्ये मोठा राडा झाला आहे.

बिग बॉसने (Bigg Boss 18) शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, "दिग्विजय अविनाशला बोलतो की, तुझ्या डोळ्यातली भीती दिसली की मला मजा येते" शेवटी या दोघांमध्ये हातापायी होते. भांडणाचे स्वरूप मारामारीत रूपांतरित होते. अविनाशने दिग्विजयला (Digvijay Rathee) धक्का दिला कारण तो भांडण थांबवत नव्हता आणि बोलतच जात होता. धक्का दिल्यावर दिग्विजय आणि अविनाश एकमेकांना भिडले. घरातील सदस्य भांडण सोडवण्यासाठी मध्ये देखील पडले मात्र ही दोघ एकमेकांना धक्का देत राहीले. अखेर दिग्विजय हातापायी करताना खाली पडला. ईशा देखील भांडणात खूप मध्यस्थी करताना पाहायला मिळाली.

एकीकडे अविनाश आणि दिग्विजयचे भांडण पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे चाहत आणि विवियनमध्ये मजेशीर संवाद घडताना पाहायला मिळत आहे. आता बिग बॉसच्या घरातून सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यात करणवीर मेहरा, चुम दरांग, श्रुतिका अर्जुन, रजत दलाल, कशिश, दिग्विजय आणि तेजिंदर यांचा समावेश आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाणार आणि घरात नवीन कोणता राडा होणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

Digvijay-Avinash Fight
Amitabh Bachchan: इकडं ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा, तिकडं अमिताभ बच्चन यांनी निम्रत कौरला पाठवलं पत्र, नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com