'बिग बॉस 18'मध्ये (Bigg Boss 18 ) रोज एक नवीन वाद पाहायला मिळत आहे. नुकताच 'वीकेंड का वार' पार पडला आहे. यात सलमान खानने घरातील अनेक सदस्यांची शाळा घेतली आहे.
सलमान 'वीकेंड का वार'मध्ये सदस्यांना एक टास्क दिला. ज्यात अविनाश मिश्रा (Avinash Mishra) आणि दिग्विजय राठीला उभे करण्यात आले आणि यातील तुमच्या मते साइड किक कोण हे सांगायला सांगितले. यावर अनेकांनी आपली मते दिली. मात्र जेव्हा यावर चाहतने उत्तर दिले. तेव्हा तिच्यात आणि अविनाशमध्ये वादावादी झाली.
चाहतने (Chahat Pandey) या टास्कमध्ये अविनाशला खूप सुनावले आहे. चाहतने अविनाश फक्त विवियन म्हणतो तेच करतो असा आरोप देखील केला. ती म्हणाली की, "विवियनने अविनाशला भांडी धुवायला सांगितली तर तो चाटून ते काम करतो. तसेच टेबल साफ करायचा असेल तर तो चाटून करेल." यावर अविनाश चाहतला इडियट म्हणतो. त्यावर प्रॉपर म्हणून ठेवण्यात आलेल्या चप्पलने चाहत अविनाशला मारते. चाहतने अविशानला एका टास्क दरम्यान जखमी केले होते. त्यानंतर या दोघांमध्ये वादाला सुरूवात झाली.
दुसरीकडे दिग्विजय हाऊस हेल्पर बनतो. सलमानने (Salman Khan) अविनाशची चांगलीच कानउघडणी केली. चाहतला बोअर म्हटल्याबद्दल सलमान अविनाशला बोला की, "तुझी भाषा चांगली नाही. तसेच तू कमेंट्स सकारात्मक घेत नाहीस." अविनाशला समजावत सलमान पुढे म्हणाला की, "तू चाहतला नम्रपणे थांबवू शकला असता. चाहत तुझ्याशी उद्धटपणे बोलली तरी तू तेच करशील का?" शेवटी सलमान खान चाहतला समजावत म्हणाला की, "तू देखील तुझ्या भाषेवर नियंत्रण ठेव.संपूर्ण भारत तुमच्याकडे पाहत आहे."
बिग बॉसचा यंदाचा 'वीकेंड का वार' खूपच गाजला. या 'वीकेंड का वार'मध्ये MTV Hustle 4 चे जज इक्का आणि Raftaar आले होते. तसेच कृष्णा अभिषेक आणि सुदेश लाहिरीने आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना खूप हसवले. 'बिग बॉस 18'मध्ये या आठवड्यात कोणही घराबाहेर गेले नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.