Maharashtra Assembly Election 2024
Ajaz KhanSAAM TV

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. अशातच सोशल मिडिया स्टार एजाज खानचा दारूण पराभव झाला आहे.
Published on

सर्वत्र निवडणुकीच्या निकालाची चर्चा पाहायला मिळत आहे. आज विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) निकालात महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. तसाच मोठा धक्का सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आणि बिग बॉस फेम अभिनेता एजाज खानला देखील मिळाला आहे.

अभिनेता एजाज खान (Ajaz Khan) सोशल मिडियावर खूप सक्रिय असतो. त्याचे इन्स्टाग्रामवर 5.6 मिलियन फॉलोवर्स आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीत त्याला बाजी मारता आली नाही आणि त्याचा दारूण पराभव झाला आहे. एजाज खान हा अभिनेता आणि राजकारणी आहे. एजाज खान हा 'बिग बॉस 7' मध्ये झळकला होता. मुंबईचा भाऊ म्हणून एजाज खानची ओळख आहे. बॉलीवूडच्या अनेक नावाजलेल्या चित्रपटात देखील त्याने काम केलं आहे.

उत्तर प्रदेशातील नगीना येथील 'आजाद समाज पक्षा'कडून एजाज खानला उमेदवारी मिळाली होती. हा पक्ष चंद्रशेखर आजाद यांचा आहे. सोशल मिडिया 5.6 मिलियन चाहते जरी असले तरी वर्सोवा मतदार संघातून निवडणूक लढविणाऱ्या एजाज खानला केवळ १४६ मते मिळाली आहेत. तर दुसरीकडे नोटाला १२१६ इतकं मतं मिळाली आहेत. यामुळे एजाज खानला सोशल मिडियावर आता ट्रोल करण्यात येत आहे.

Maharashtra Assembly Election 2024
Abhijeet Kelkar: 'धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...' देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची जबरदस्त पोस्ट, म्हणाला...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com