Railway Mega Block : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी मेगा ब्लॉक; लोकल, एक्सप्रेस गाड्या धावणार उशिराने

Mumbai News : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर रविवार (२४ नोव्हेंबर) मेगा ब्लॉक
Railway Mega Block
Railway Mega BlockSaam tv
Published On

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर रविवार (२४ नोव्हेंबर) मेगा ब्लॉक करण्यात येत आहे. ठाणे आणि दिवा दरम्यान ५ व्या आणि ६ व्या मार्गिकेवर सकाळी १०.५० ते दुपारी ३.२० पर्यंत काम असणार असून या दरम्यान धावणाऱ्या गाड्या उशिराने धावणार आहेत.  

अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी ११ वाजून १० मिनिट ते सायंकाळी ४ वाजून १० मिनिटपर्यंत या ब्लॉक कालावधीत वाशी/नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तर ठाणे येथून सकाळी १० वाजून ३५ मिनिट ते सायंकाळी ४ वाजून ७ वाजेपर्यंत वाशी/नेरूळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा आणि वाशी/नेरुळ/पनवेल येथून सकाळी १० वाजून २५ मिनिट ते सायंकाळी ४ वाजून ९ वाजेपर्यंत जाणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

उपनगरीय सेवांचे डायव्हर्शन
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.५७ (कर्जत लोकल S-17) ते दुपारी २ वाजून ४२ मिनिटांपर्यंत (आसनगाव लोकल AN-15) सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्धजलद मार्गावरील उपनगरी ट्रेन्स या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. या सर्व गाड्या त्यांच्या नियोजित थांब्याव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा व दिवा स्थानकात थांबतील. तसेच त्यांच्या नियोजित आगमनापेक्षा १० मिनिटे उशीराने पोहोचतील.

Railway Mega Block
Vidhan Sabha Election Result : अकोल्यात बंडखोरीचा भाजपला फटका; काँग्रेसचे साजिद खान पठाण विजयी

तर कल्याण येथून सकाळी १० वाजून २८ मिनिट (अंबरनाथ लोकल A-26) ते दुपारी ३ वाजून ६ मनीटपर्यंत (खोपोली लोकल KP-8) सुटणाऱ्या अप जलद/अर्धजलद लोकल कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा व कळवा स्थानकात थांबतील. पुढे ठाणे स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि गंतव्यस्थानी नियोजित आगमनापेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचेल.

अप मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे डायव्हर्शन
अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. वेळापत्रकापेक्षा १० ते १५ मिनिटे उशीराने धावणार आहेत. तसेच नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस (१२१४०), चेन्नई - छछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस (२२१६०), सोलापूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत (22226), बनारस- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस (12168), हावडा - छछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस (12321), हटिया - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस (12812), कोइम्बतूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस (11014), पाटलीपुत्र - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस (12142), प्रयागराज- लोकमान्य टिळक टर्मिनस दुरांतो एक्स्प्रेस (12294), गोरखपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस (11080), छापरा - ललोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस (11060), चेन्नई - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस (12164), आग्रा कँट - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस (12162), 

Railway Mega Block
Vidhan Sabha Election Result : रायगड जिल्ह्यात महायुतीची सरशी; महाविकास आघाडीच्या हाती भोपळा

डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे डायव्हर्शन
त्याचप्रमाणे डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्या वेळापत्रकापेक्षा १० ते १५ मिनिटे उशिराने धावतील. यात  11055 लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर एक्स्प्रेस, 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस - जयनगर एक्स्प्रेस, 17222 लोकमान्य टिळक टर्मिनस- काकीनाडा एक्स्प्रेस, 11071 लोकमान्य टिळक टर्मिनस- बरौनी एक्स्प्रेस, 13202 लोकमान्य टिळक टर्मिनस- पाटणा जं एक्सप्रेस. 

मेल/एक्सप्रेस सेवांचे डायव्हर्शन 
लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाऊन ५ व्या मार्गावरील मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावरून वळवण्यात येतील. तर लोकमान्य टिळक टर्मिनस /दादर/छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे येणाऱ्या अप ६ व्या मार्गावरील मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावरून वळवण्यात येतील.

मेल/एक्स्प्रेस सेवांची शॉर्ट टर्मिनेशन/ओरिजिनेशन
१6346 तिरुवनंथपुरम- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, २२ नोव्हेंबर रोजी सुरू होणारा प्रवास पनवेल स्टेशनवर शॉर्ट टर्मिनेट होईल आणि पनवेल ते लोकमान्य टिळक टर्मिनसच्या दरम्यान सेवा रद्द राहील.
16345 लोकमान्य टिळक टर्मिनस- तिरुअनंथपुरम एक्स्प्रेस. दरम्यान २४ नोव्हेंबर रोजी सुरू होणारा प्रवास पनवेल येथे शॉर्ट ओरीजनेट केला जाईल. या ट्रेनची लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेलच्या दरम्यान सेवा रद्द राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com