Ejaz Lakdawala News: एक मच्छर आदमी को...; गॅंगस्टर एजाज लकडावालाने मेलेल्या डासांची बाटली थेट कोर्टात आणली

Gangster Ejaz Lakdawala Mosquito Bottle News: गॅंगस्टर एजाज लकडावालाच्या या करामतीची चांगलीच चर्चा सुरू आहे. मात्र, एवढं करुनही न्यायालयाने त्याला मच्छरदाणी देण्यास नकार दिला आहे.
Ejaz Lakdawala Mosquito Bottle News
Ejaz Lakdawala Mosquito Bottle NewsSaam TV
Published On

Ejaz Lakdawala Today News: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा म्होरक्या गॅंगस्टर एजाज लकडावाला याला डासांनी (Mosquito) वैतागून सोडलं आहे. २०२० पासून कारागृहात असलेल्या लकडावाला याने आपल्याला मच्छरदाणी मिळावी यासाठी कोर्टात अर्ज केला होता. डासांनी वैतागलेल्या गॅंगस्टरने (Ejaz Lakdawala) तुरुंगात अनेक डास मारले आणि एका प्लास्टिकच्या बाटलीत भरले. मेलेल्या डासांची ही बाटली पुरावा म्हणून त्याने थेट न्यायालयात न्यायाधीशांसमोर आणली आहे. त्याच्या या करामतीची चांगलीच चर्चा सुरू आहे. मात्र, एवढं करुनही न्यायालयाने त्याला मच्छरदाणी देण्यास नकार दिला आहे. (Gangster Ejaz Lakdawala Latest News)

Ejaz Lakdawala Mosquito Bottle News
Lizard Video: सरडा आणि माणसाची घनिष्ठ मैत्री पाहून हैराण व्हाल; सरड्यासोबत तरुण करतो 'या' गोष्टी...

मच्छरदाणी वापरण्यासाठी मिळावी यासाठी गुंड लकडावालाने मेलेल्या डासांची बाटली न्यायालयात सादर केली. मात्र अनोखी शक्कल लढवूनही न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला. लकडावाला हा सध्या विविध आरोपांखाली नवी मुंबईतील तळोजा कारागृहात (Taloja Jail) बंदीस्त आहे. मच्छरांपासून बचावासाठी त्याने न्यायालयाकडे आपल्याला मच्छरदाणी मिळावी यासाठी याचिका केली होती. या याचिकेला कारागृह प्रशासनाने विरोध केला होता. सुरक्षेच्या कारणात्सव कारागृह प्रशासनाने या याचिकेला विरोध केल्यानंतर अखेर न्यायालयानेही गॅंगस्टरची याचिका फेटाळली आहे.

यावेळी अर्ज फेटाळताना एजाज लकडावाला याला सुरक्षेच्या कारणात्सव ही याचिका फेटाळली असल्याचं सांगितलं. तसेच अर्जदार डासांपासून बचावासाठी क्रीमचा वापर करु शकता असा सल्ला न्यायालयाने दिला आहे. (Latest Marathi News)

Ejaz Lakdawala Mosquito Bottle News
Aurangbad Crime : मुलीला जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर सामूहिक अत्याचार; औरंगाबादेतील धक्कादायक घटना

कोण आहे एजाज लकडावाला?

एजाज लकडावाला विरोधात हत्या, खंडणी सारख्या अनेक तक्रारी असून मुंबईतही अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. जोगेश्वरीच्या अमृतनगरमध्ये राहणाऱ्या एजाजवर तो अल्पवयीन असतानाच पहिला गुन्हा नोंदवण्यात आला होता. शाळेत असताना त्याने त्याच्या शिक्षिकेला मारहाण केली होती. त्यानंतर एजाज परिसरात छोट्या-मोठ्या चोरी आणि मारामाऱ्या करू लागला. त्यावेळीच  'डी गँग'ची नजर त्याच्यावर पडली. पुढे राजनच्या सांगण्यावरून तो सुपाऱ्या घेऊ लागला. पायधुनी पोलिस ठाण्यात एजाजवर 2 हत्येच्या गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यात तो अटकेत असताना. (Who is Eijaz Lakdawala?)

Ejaz Lakdawala Mosquito Bottle News
Nawab Malik : नवाब मलिक यांना मोठा धक्का! कोट्यवधींची संपत्ती ED ताब्यात घेणार

1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर छोटा राजनसह एजाजनेही दाऊदपासून फारकत घेतली. बॉम्बस्फोटातील काही आरोपी जामिनावर तुरुंगातून सुटल्याचे काही दिवसांनी छोटा राजनला समजले. त्यामुळे त्याने काही लोकांची हत्या केली. या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली असून तो तिहार तुरुंगात होता. बॉम्बस्फोटाचा आरोपी म्हणून एजाजला त्या काळात तुरुंगवासही झाला होता.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com