Salman Khan Apartment Firing Case Update Instagram @beingsalmankhan
मनोरंजन बातम्या

Salman Khan: सलमान खानला पुन्हा एकदा धमकी; लॉरेन्स बिश्नोईच्या नावे बुक केलेली कार गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर

Salman Khan Apartment Firing Case Update: सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर १४ एप्रिलला गोळीबार झाला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ३ संशयित आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी आता पुन्हा एकदा सलमान खानला धमकी देण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर १४ एप्रिलला गोळीबार झाला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ३ संशयित आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी आता पुन्हा एकदा सलमान खानला धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला धमकी दिली आहे. आज एका व्यक्तीने सलमान खानच्या घरी कॅब पाठवली होती. ही कॅब लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने बुक करुन गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पाठवली होती.

ही कार गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ थांबली. कॅब ड्रायव्हरने तिथे उभ्या असलेल्या सिक्युरिटी गार्डला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने कॅब बुक केल्याचे सांगितले. या कॅबची बुकिंग सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट ते वांद्रे पोलिस स्टेशनपर्यंत करण्यात आली होती.

सिक्युरिटी गार्डने लॉरेन्स बिश्नोईचे नाव ऐकताच या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी चालकाची चौकशी केली. त्याच्याकडून माहिती घेतली. या प्रकरणी कॅब बुक करणारा व्यक्ती गाझियाबादचा असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने कार बुक करणाऱ्या आरोपीचे नाव रोहित त्यागी (२०) आहे. याप्रकरणी पोलिस आरोपीची चौकशी करत आहेत.

दरम्यान, सलमान खान आज मुंबई विमानतळावर स्पॉट झाला होता. गोळीबार प्रकरणानंतर सलमान पहिल्यांदाच घराबाहेर पडला आहे. सलमान खान येणार असल्याने विमानतळावर कडेकोड बंदोबस्त करण्यात आला होता. सलमान खानचे विमानतळावरीली व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ST Bus: दीपोत्सवाची एसटीकडून तयारी, पुण्यातून ५९८ जाता बस, कुठून सुटणार एसटी?

Whatsapp: व्हॉट्सअ‍ॅप वापरुन बना श्रीमंत! दरमहा लाखो रुपये कमवण्याचे ५ स्मार्ट मार्ग, एकदा नक्की पाहा

Mumbai Gateway Ferry Closed : गेटवे ते मांडवा बोटसेवा बंद! काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

Kantara Chapter 1 OTT : 'कांतारा' चे वादळ 'ओटीटी'वर कधी येणार? वाचा अपडेट

Buldhana : महाबीजकडून शेतकऱ्यांची फसवणूक; सीड्स उत्पादन करणेसाठी दिलेले बियाणे निघाले दुसऱ्या जातीचे

SCROLL FOR NEXT