Priyadarshini Indalkar: 'स्वप्नपूर्ती...'; आयुष्यातला पहिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाल्यानंतर प्रियदर्शनी इंदलकरची खास पोस्ट

Priyadarshini Indalkar Won Filmfare Award: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर आपल्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवत असते. प्रियदर्शनीला नुकताच फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. त्यानिमित्त तिने पोस्ट शेअर केली आहे.
Priyadarshini Indalkar
Priyadarshini IndalkarSaam Tv

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर आपल्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवत असते. प्रियदर्शनी अनेक चित्रपट आणि वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. प्रियदर्शनीने मागील वर्षी 'फुलराणी' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी प्रियदर्शनीला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले. आता प्रियदर्शनीला या चित्रपटासाठी पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. याचसाठी प्रियदर्शनीने पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे.

प्रियदर्शनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या पहिल्या फिल्मफेअर अवॉर्डचा फोटो शेअर करत पोस्ट केली आहे. या फोटोवर तिने कॅप्शनमध्ये लिहलंय की, 'ही अतुलनीय फिल्मफेअर सोहळ्याची रात्र!!! सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीसाठी पहिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. मला अजूनही विश्वास बसत नाहीये. जे माझ्या या प्रवासात माझ्यासोबत होते त्या सर्वांचे मनापासून आभार. माझे कुटुंब, मित्र, खूप स्पेशल मित्र, मार्गदर्शक, निर्माते, दिग्दर्शक आणि सर्वांचे खूप आभार. असेच नवीन चित्रपट बनवूया. एकमेकांना प्रोत्साहन देत पुढे जाऊया #स्वप्नपूर्ती', असं कॅप्शन तिने या पोस्टला दिले आहे. प्रियदर्शनीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Priyadarshini Indalkar
Filmfare Marathi 2024: 'फिल्मफेअर मराठी' पुरस्कार सोहळ्यात कोणत्या चित्रपटाने मारली बाजी? पाहा विजेत्यांची यादी

प्रियदर्शनी इंदलकरला फुलराणी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. प्रियदर्शनीचा प्रमुख भूमिकेतील हा पहिला चित्रपट होता. तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत होते.

Priyadarshini Indalkar
Article 370: 'आर्टिकल ३७०' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज; जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com