Ram Charan Birthday: राम चरणच्या नावामागे आहे रंजक कथा, 'नाटू-नाटू' गाण्यासाठी मिळालाय ऑस्कर अवॉर्ड

Ram Charan Movie: राम चरणच्या वाढदिवसानिमित्त (Ram Charan Birthday) आज आपण त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफविषयीच्या न माहिती असलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत...
Ram Charan Birthday Special
Ram Charan Birthday Special Saam Tv
Published On

Ram Charan Bday Special:

साऊथचा सुपरस्टार राम चरण (Ram Charan) आज आपला 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त राम चरणवर सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसह सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राम चरण फक्त साऊथच्या चित्रपटांमध्ये काम करत नाही तर त्याने बॉलिवूडमध्ये देखील दमदार एन्ट्री केली आहे. पण त्याला हिंदी चित्रपटामध्ये यश मिळाले नाही. राम चरणने 2013 मध्ये प्रियंका चोप्रासोबत (Priyanka Chopra) 'जंजीर' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. राम चरणला 'आरआरआर' या चित्रपटातील 'नाटू-नाटू' या गाण्यासाठी ऑस्कर अवॉर्ड देखील मिळाला आहे. राम चरणच्या वाढदिवसानिमित्त (Ram Charan Birthday) आज आपण त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफविषयीच्या न माहिती असलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत...

राम चरणाच्या नावामागे एक रंजक कथा आहे. याबाबत अनेकांना माहिती नाही. अभिनेत्याच्या नावाचा अर्थ भगवान रामाच्या चरणांमधून निघणारा प्रकाश असा आहे. चिरंजीवीचे वडील हे भगवान अंजनेयचे भक्त आहेत आणि त्यांचा असा विश्वास होता की, राम चरण हा हनुमानाचा वरदान आहे. म्हणून त्यांनी त्यांचे नाव राम चरण ठेवले. राम चरण हा साऊथचा मेगास्टार चिरंजीवी यांचा मुलगा आहे. हे सर्वांनाच माहीत आहे. तर दुसरीकडे राम चरणचे आजोबा देखील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व होते. राम चरण यांचे आजोबा अल्लू राम लिंगैया हे स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. भारत छोडो आंदोलनादरम्यान ब्रिटिशांनीही त्यांना ताब्यात घेतले.

स्वातंत्र्यसैनिक असण्यासोबतच राम चरण यांचे आजोबा हे एक प्रसिद्ध विनोदी अभिनेते देखील होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात १ हजारांहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. राम चरण हा एक उत्तम अभिनेता तर आहेच पण तो बिझनेसमन आणि गरिबांनाही मदत करतो. तो हैदराबाद पोलो रायडिंग क्लब आणि एअरलाइन ट्रूजेटचा मालक आहे. राम चरणने आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून चाहत्यांसह सर्वांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. राम चरण आणि राणा दग्गुबती चेन्नईतील एकाच शाळेत नववीपर्यंत शिकले. ते लहानपणापासूनचे चांगले मित्र होते.

अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा आणि रामची पत्नी उपासना या एकाच शाळेमध्ये शिकल्या आहेत. राम चरणला नेहमीच चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा होती. वडील चिरंजीवी यांचे चित्रपट पाहत तो मोठा झाला. त्याने किशोर नमित कपूर ॲक्टिंग स्कूलमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. हृतिक रोशन, करीना कपूर खान आणि प्रियांका चोप्रा यांसारख्या दिग्गज कलाकारांनीही या ॲक्टिंग स्कूलमधून अभिनयाचे धडे घेतले आहेत. राम चरण हा सध्या साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील टॉपचा अभिनेता आहे. त्याचे चित्रपट सुपरहिट ठरत असून चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात.

Ram Charan Birthday Special
हुक्का पार्लरवर मुंबई पोलिसांचा छापा, Munawar Faruqui ला पोलिसांनी घेतलं ताब्यात; नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com