Famous Actor saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actor : "मला बापाला मरताना नाही पाहायचंय..."; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

Marathi Actor Father Hospitalised : प्रसिद्ध अभिनेत्याचे वडील रुग्णालयात दाखल आहेत. वडिलांच्या उपचारांसाठी हॉस्पिटमधून जास्तीचे पैसे उकळले जात असल्याचा धक्कादायक खुलासा अभिनेत्याने केला आहे.

Shreya Maskar

साम टिव्ही प्रतिनिधी - विश्व भूषण लिमये

प्रसिद्ध अभिनेत्याचे वडिल रुग्णालयात दाखल

उपचारांसाठी हॉस्पिटमधून जास्तीचे पैसे उकळले जात असल्याचा खुलासा अभिनेत्याने केला

ढसाढसा रडत अभिनेत्याने आर्थिक मदतीची विनंती केली.

सैराट फेम अभिनेता अरबाज शेख मोठ्या अडचणीत अडकला आहे. त्याच्या वडिलांची प्रकृती बिघडली असून ते सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. मध्यरात्री एक व्हिडीओ शेअर करून अभिनेत्याने चाहत्यांकडे आर्थिक मदतीची विनंती केली आहे. तसेच उपचारांसाठी हॉस्पिटमधून जास्तीचे पैसे उकळले जात असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. हॉस्पिटलवर आरोप केले आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

व्हिडिओमध्ये अरबाज बोलतो की, "नमस्कार मी अरबाज शेख, मी आता सोलापूर मधल्या नोबेल हॉस्पिटल समोर उभा आहे. माझ्या पप्पांना ब्रेन हॅमरेज झाला आहे, त्यामुळे आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आहे. आता ८ दिवस झाले आहेत. पप्पांना हार्टचा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही त्याला नोबेलला शिफ्ट केले आहे. पण मला नोबेलचा खूपच घाण अनुभव आला. ऍडमिट केलं तेव्हा त्यांनी दहा हजार रुपये डिपॉझिट भरायला सांगितले जे भरले. त्यानंतर त्यांनी गोळ्यांचे प्रिस्क्रिप्शन दिले आणि सांगितले की, आमच्याच हॉस्पिटलच्याच मेडिकल मधून आणा..."

पुढे अरबाज म्हणतो की, "डॉक्टरांनी इंजेक्शनही घेण्यास सांगितले. ज्याचा खर्च 40 हजाराच्या वर होत्या. त्या गोळ्या त्यांनी मला तीन वेळा आणायला सांगितल्या. पप्पांना या आधी ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते. तेव्हा असे काही आढळले नाही. तेव्हा मी याच गोळ्या बाहेरून अर्ध्या किंमतीमध्ये आणायचो. 40 हजाराच्या गोळ्या मला बाहेर 20 हजारांना पडल्या असत्या. इथे नुसती लूट होत आहे. मला बापाला मला मरताना नाही बघायचे...त्यामुळे मी त्यांना शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला, पण इथे मला खूप वाईट अनुभव आला."

शेवटी अरबाज म्हणतो की, "कृपया मला सांगा माझ्या वडिलांवर कुठे ट्रीटमेंट करू आणि कशी ट्रीटमेंट करू...मला आता काहीच कळत नाहीये. माझ्या बापाला मला काहीही करून वाचवायचे आहे. मला मदत करा प्लीज..." त्यानंतर अरबाज ढसाढसा रडायला लागतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

Maharashtra News Live Update: कालच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

Kidney disease: किडनी खराब होण्याआधी शरीर देतं हे ५ धोकादायक इशारे; क्रिएटिनिन वाढण्याचं खरं कारण जाणून घ्या

Early cancer symptoms: तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्येच का होतं कॅन्सरचं निदान? डॉक्टरांनी सांगितलं यामागचं कारण

SCROLL FOR NEXT