पुण्यात मुलीनेच धारदार शस्त्राने बापाला संपवलं; धक्कादायक कारण समोर

pune crime news : पुण्यात मुलीनेच धारदार शस्त्राने बापाला संपवल्याची घटना घडली आहे. मुलीने बापाची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
pune crime
pune newsSaam tv
Published On
Summary

पुण्यात पुन्हा रक्तरंजित थरार

लेकीने बापाला संपवलं

मुलीने बापाची हत्या केल्याने पुण्यात खळबळ

सचिन जाधव, साम टीव्ही

पुण्यात गुन्ह्यांची मालिका सुरू असल्याचे दिसून आहे. पुण्यात एका मुलीने बापाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्येची घटना रविवारी रात्री ११ वाजता घडली. पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काशेवाडीतून हा प्रकार समोर आला आहे. हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील काशेवाडीत राहणाऱ्या ७० वर्षीय जैनुदीन दस्तगीर फुलारी यांची हत्या करण्यात आली आहे. जैनुदीन यांची हत्या त्यांच्या मुलीनेच केल्याचे समोर आलं आहे. त्यांच्या ४० वर्षीय मुलीने ही हत्या केली. दिलशाद जैनुदीन फुलारी असे हत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. खडक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी आरोपी मुलीला देखील अटक केली आहे.

pune crime
Pune : पुण्यात चाललंय काय? महिला पोलीस अधिकाऱ्याचा सासरच्या मंडळीकडून छळ अन् मारहाण, ६ जणांविरुद्ध गुन्हा

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैनुद्दीन हे त्यांची पत्नी आणि मुलगी दिलशाद फुलारीसोबत एकत्र राहत होते. जैनुद्दीन यांची मुले वेगळी राहतात. दिलशाद हिचा विवाह झालेला नाही. जैनुद्दीन फुलारी हे दररोज दारू पिऊन घरी यायचे. घरी आल्यावर दिलशादला शिवीगाळ करायचे.

जैनुद्दीन फुलारी हे रविवारी देखील दारू पिऊन आले होते. घरात आल्यानंतर दिलशाद हिला शिवीगाळ करायला लागले. त्यातून दोघांमध्ये शाद्बिक बाचाबाची झाली. रागाच्या भरात दिलशादने घरातील किचन ओट्यावर ठेवलेला कांदा कापण्याचा धारदार चाकू हातात घेतला. त्यानंतर दिलशादने वडिलांच्या छातीवर वार केला.

pune crime
Shocking : मुंबई हादरली! गार्डनमध्ये खेळणाऱ्या ९ वर्षीय मुलीसोबत पोलीस अधिकाऱ्याचे अश्लील वर्तन, प्राव्हेट पार्टही दाखवला

हल्ल्यानंतर ते जागेवरच कोसळले. जखमी झालेल्या जैनुद्दीन यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. हल्ला केल्यानंतर जैनुद्दीन यांना अधिक रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत दिलशाद फुलारीला अटक केली आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक कुलदीप व्हटकर तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com