RJ Malishka SAAM TV
मनोरंजन बातम्या

RJ Malishka दिसणार सरोजिनी नायडूंच्या भूमिकेत; मेकअपसाठी लागले तब्बल ९ तास, स्वतः सांगितला किस्सा

RJ Malishka Freedom At Midnight : 'फ्रीडम ॲट मिडनाइट'मध्ये आर. जे. मलिष्का सरोजिनी नायडू यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका साकारायला त्यांना मेकअपसाठी तब्बल 9 तास लागले आहेत.

Shreya Maskar

सोनी लिव्‍हवरील बहुप्रतिक्षित सिरीज 'फ्रीडम ॲट मिडनाइट' (Freedom At Midnight) या १५ नोव्‍हेंबरला प्रदर्शित होणार आहे आणि चाहते या सिरीजची रीलीज तारीख जाणून घेण्‍याची वाट पाहत आहेत. मलिष्‍का मेंडोन्सा 'फ्रीडम ॲट मिडनाइट'मध्‍ये सरोजिनी नायडू यांची भूमिका साकारली आहे. तिला मेकअपसाठी दिवसातून ९ तास वेळ लागला हा खुलासा तिने केला आहे.

डॉमिनिक लॅपियर व लॅरी कॉलिन्‍स यांच्‍या प्रख्‍यात पुस्‍तकावर आधारित सिरीज 'फ्रीडम ॲट मिडनाइट' भारताच्‍या स्‍वातंत्र्यामधील महत्त्वपूर्ण क्षणांना प्रकाशझोतात आणते. या सिरीजमध्‍ये प्रतिभावान कलाकारांनी प्रख्‍यात स्‍वातंत्र्यसेनानींची भूमिका साकारली आहे. या कलाकारांपैकी एक आहेत मलिष्‍का मेंडोन्सा (RJ Malishka) ज्‍यांनी या सिरीजमध्‍ये भारताच्‍या स्‍वातंत्र्य लढ्यामधील क्रांतिकारी लीडर सरोजिनी नायडू यांची भूमिका साकारली आहे.

सरोजिनी नायडू ( Sarojini Naidu) यांचा लुक प्राप्‍त करण्‍यासाठी मलिष्‍का यांनी मेकअप चेअरवर दररोज ४ तास व्‍यतित केले आणि परिपूर्ण प्रोस्‍थेटिक्‍स साध्‍य केले. या प्रक्रियेबाबत सांगताना त्‍या म्‍हणाल्‍या, "प्रोस्थेटिक्‍स परिधान करण्‍याचे आव्‍हान होते. मी दररोज मेकअपसाठी खूप वेळ व्‍यतित केला, दिवसाला जवळपास ९ तास लागत होते, ज्‍यानंतर प्रोस्‍थेटिक्‍स योग्‍यरित्‍या बसवले जायचे. सरोजिनी नायडू यांच्‍यासारखे दिसण्‍यासोबत वावरण्याच्या आव्‍हानांचा देखील सामना करावा लागला. सूर्यप्रकाशात प्रोस्‍थेटिक्‍स वितळायचे, प्रोस्‍थेटिक्‍सखाली असलेल्‍या माझ्या चेहऱ्यावर घाम येत होता. यामुळे माझ्या चेहऱ्यावर घाम न येण्‍यासाठी आणि प्रोस्‍थेटिक्‍स वितळण्‍याला थांबवण्‍यासाठी मी सावलीमध्‍ये एसीच्‍या समोर बसत होते."

त्‍यांनी सिरीज 'फ्रीडम ॲट मिडनाइट'च्‍या टीमचे अविरत पाठिंब्‍यासाठी आभार देखील व्‍यक्‍त केले, तसेच त्‍यांच्‍यामधील परिवर्तनाचे श्रेय त्‍यांना दिले. त्‍या पुढे म्‍हणाल्‍या, "मेकअप आर्टिस्‍ट्सपासून आमचे दिग्‍दर्शक निखिल अडवाणी यांच्‍यापर्यंत सर्वांनी सर्वकाही परिपूर्ण असण्‍याच्या खात्रीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सेटवर त्‍यांची समर्पितता दिसत होती. प्रत्‍येक कलाकार व टीममधील सदस्‍याने सिरीज उत्तम होण्‍यासाठी अथक मेहनत घेतली. आव्‍हानांचा सामना केल्‍यानंतर देखील मिळालेले फळ उल्‍लेखनीय आहे. मी प्रेक्षकांना ही सिरीज पाहताना बघण्‍यास अत्यंत उत्सुक आहे. ही अत्‍यंत विशेष सिरीज आहे."

स्‍टुडिओनेक्‍स्‍टसोबत सहयोगाने एम्‍मी एंटरटेन्‍मेंट (मोनिषा अडवाणी व मधू भोजवानी)द्वारे निर्मित या शोचे शोरनर व दिग्‍दर्शक निखिल अडवाणी आहेत. या सिरीजमध्‍ये प्रतिभावान कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत, जसे जवाहरलाल नेहरू यांच्‍या भूमिकेत सिद्धांत गुप्‍ता, महात्‍मा गांधी यांच्‍या भूमिकेत चिराग वोहरा, सरदार वल्‍लभभाई पटेल यांच्‍या भूमिकेत राजेंद्र चावला, मुहम्मद अली जिना यांच्‍या भूमिकेत आरिफ जाकारिया, फातिमा जिना यांच्‍या भूमिकेत ईरा दुबे, सरोजिनी नायडू यांच्‍या भूमिकेत मलिष्‍का मेंडोन्‍सा, लियाकत अली खान यांच्‍या भूमिकेत राजेश कुमार, व्‍ही. पी. मेनन यांच्‍या भूमिकेत केसी शंकर, लॉर्ड लुईस माऊंटबॅटन यांच्‍या भूमिकेत ल्‍यूक मॅकगिबनी, लेडी एडविना माऊंटबॅटन यांच्‍या भूमिकेत कॉर्डलिया बुगेजा, आर्चीबाल्‍ड वेव्‍हेल यांच्‍या भूमिकेत ॲलिस्‍टर फिन्‍ले, क्‍लेमेंट अॅटली यांच्‍या भूमिकेत अँड्र्यू कुलुम, सिरील रॅडक्लिफ यांच्‍या भूमिकेत रिचर्ड टेव्‍हरसन.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

Post Office Scheme: ५ वर्षात मिळणार ३६ लाख रुपये, या सरकारी योजनेत गुंतवणूक करुन व्हाल मालामाल

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

SCROLL FOR NEXT