Ratan Tata's Will: रतन टाटांची इच्छा, शांतनू नायडू आणि डॉग टिटोसाठी सोडली कोट्यवधींची संपत्ती; मृत्यूपत्रात काय लिहिलं? वाचा...

Ratan Tata Dog Tito : उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर लोकांच्या मनात एकच प्रश्न येत होता की, त्यांच्या निधनानंतर त्यांची 10 हजार कोटींची मालमत्ता कोणाला मिळणार आहे. यातच रतन टाट यांचं मृत्यूपत्र समोर आलं आहे.
रतन टाटांची इच्छा, शांतनू नायडू आणि डॉग टिटोसाठी सोडली कोट्यवधींची संपत्ती; मृत्यूपत्रात काय लिहिलं? वाचा...
Ratan Tata's WillSaam Tv
Published On

अलीकडेच प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं. यानंतर आता त्यांचं मृत्यूपत्राबद्दल माहिती समोर आली आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या जर्मन शेफर्ड कुत्रा टिटो याची संपूर्ण काळजी घेतली जाईल, याची तरतूद केली आहे. रतन टाटा यांनी आपल्यामागे 10 हजार कोटींहून अधिक संपत्ती सोडली आहे.

ही संपत्ती त्याच्या बहिणी शिरीन आणि डायना यांच्यामध्ये विभागली जाईल. याशिवाय घरातील कर्मचारी आणि इतरांमध्येही याचा काही वाट देण्यात येणार आहे. मात्र रतन टाटा यांच्या कुत्र्याला जेवढी संपत्ती मिळणार आहे, त्यानंतर तो किमान भारतातील सर्वात श्रीमंत कुत्रा बनेल. रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रात त्यांचा खास मित्र शंतनूचाही उल्लेख आहे.

रतन टाटांची इच्छा, शांतनू नायडू आणि डॉग टिटोसाठी सोडली कोट्यवधींची संपत्ती; मृत्यूपत्रात काय लिहिलं? वाचा...
Radhakrishna Vikhe Patil Net Worth: राधाकृष्ण विखे पाटलांच्या संपत्तीत घट, जाणून घ्या किती आहे एकूण मालमत्ता

रतन टाटा यांनी टिटोला पाच-सहा वर्षांपूर्वी दत्तक घेतलं होतं. रतन टाटा यांच्या इच्छेनुसार, टिटोची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांचे स्वयंपाकी राज शॉ यांच्याकडे असेल. गेल्या तीस वर्षांपासून रतन टाटा यांचे घरगडी असलेले सुबैया यांच्यासाठी त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात तरतूद केली आहे. टाटा जेव्हाही परदेशात जायचे तेव्हा ते रंजन आणि सुबैयांसाठी डिझायनर कपडे खरेदी करायचे.

मृत्युपत्रात टिटोला काय मिळालं?

रतन टाटा यांनी त्यांचा जर्मन शेफर्ड कुत्रा टिटोची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांचा स्वयंपाकी राजन शॉ यांच्यावर सोपवली आहे. त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांनी टिटोच्या काळजीसाठी बरीच रक्कम सोडली आहे.

रतन टाटांची इच्छा, शांतनू नायडू आणि डॉग टिटोसाठी सोडली कोट्यवधींची संपत्ती; मृत्यूपत्रात काय लिहिलं? वाचा...
Aaditya Thackeray Net Worth : बीएमडब्लू कार, दोन गाळे, कोट्यवधीचे दागिने; किती आहे आदित्य ठाकरे यांची संपत्ती? वाचा...

शंतनू नायडू यांना काय मिळालं?

रतन टाटा यांनी त्यांचे सहकारी शंतनू नायडू यांचाही त्यांच्या मृत्यूपत्रात समावेश केला आहे. टाटा यांनी आरएनटी कार्यालयातील महाव्यवस्थापक नायडू यांचा उपक्रम असलेल्या गुडफेलोमधील आपला हिस्सा सोडला आहे. नायडूंच्या शिक्षणासाठीचे कर्जही त्यांनी माफ केले आहे. 'गुडफेलो' ही 2022 मध्ये सुरू झालेली ज्येष्ठ नागरिकांसाठी सबस्क्रिप्शन-आधारित सहचर सेवा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com