Radhakrishna Vikhe Patil Net Worth: राधाकृष्ण विखे पाटलांच्या संपत्तीत घट, जाणून घ्या किती आहे एकूण मालमत्ता

Maharashtra Assembly Election 2024 : राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संपत्तीत घट झाली आहे. किती आहे त्यांची संपत्ती जाणून घ्या...
राधाकृष्ण विखे पाटलांच्या संपत्तीत घट, जाणून घ्या किती आहे एकूण मालमत्ता
Radhakrishna Vikhe Patil Net WorthSaam Tv
Published On

सचिन बनसोडे, साम टीव्ही, प्रतिनिधी

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल शिर्डी विधानसभा मतदारसंघातून आठव्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या स्थावर मालत्तेत तब्बल 1.79 कोटी रूपयांची घट झाली आहे.

परंतु पत्नी शालीनी विखेंच्या संपत्तीत 81.35 लाखांनी स्थावर तर 2.4 कोटींनी जंगम मालमत्तेत वाढ झाली. मंत्री विखेंच्या नावावर एकही चार चाकी गाडी नाही. मंत्री विखेंकडे 550 ग्रॅम सोने असून त्यांच्या पत्नी शालीनी विखेंकडे 1150 ग्रॅम सोने असल्याचे नमूद केले आहे.

राधाकृष्ण विखे पाटलांच्या संपत्तीत घट, जाणून घ्या किती आहे एकूण मालमत्ता
Aaditya Thackeray Net Worth : बीएमडब्लू कार, दोन गाळे, कोट्यवधीचे दागिने; किती आहे आदित्य ठाकरे यांची संपत्ती? वाचा...

2019 च्या तुलनेत 2024 मध्ये संपत्तीत मालमत्तेतील वाढ झाली की घट?

2019 : वाहन - एकही नाही.

स्वतःकडे सोने - 550 ग्रॅम.

पत्नीकडे सोने - 1150 ग्रॅम.

स्वतःकडे स्थावर मालमत्ता - 13 कोटी 14 लाख 74 हजार 48

जंगम मालमत्ता - 4 कोटी 69 लाख 78 हजार 672

पत्नीकडे स्थावर मालमत्ता - 2 कोटी 18 लाख 10 हजार पाचशे 80

जंगम मालमत्ता - 4 कोटी 75 लाख 62 हजार 979

2024 : वाहन - एकही नाही

स्वतःकडे सोने - 550 ग्रॅम

पत्नीकडे सोने - 1150 ग्रॅम

स्वतःकडे स्थावर मालमत्ता - 11 कोटी 35 लाख 39 हजार 820

जंगम मालमत्ता - 12 कोटी 74 लाख 82 हजार 160

पत्नीकडे स्थावर मालमत्ता - 2 कोटी 99 लाख 45 हजार 610

पत्नीकडे जंगम मालमत्ता - 6 कोटी 79 लाख 82 हजार 505

राधाकृष्ण विखे पाटलांच्या संपत्तीत घट, जाणून घ्या किती आहे एकूण मालमत्ता
Kudal Malvan Politics : निलेश राणे पुन्हा गड मिळवणार की वैभव नाईक हॅट्रिक करणार? काय आहे कुडाळ-मालवणमधील राजकीय समीकरण?

राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडील संपत्ती घाट झाली असून त्यांची स्थावर मालमत्ता एकूण 1 कोटी 79 लाख 34 हजार 228 आहे, तर जंगम मध्ये वाढ 8 कोटी 5 लाख 3 हजार 488 रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच त्यांच्या पत्नीकडे स्थावर मालमत्तेत 81 लाख 35 हजार 30 रुपयांनी वाढ झाली तर. तर जंगम मालमत्तेतही 2 कोटी 4 लाख 19 हजार 526 रुपयांनी वाढ झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com