Shreya Maskar
मटार पराठा बनवण्यासाठी मटार, लसूण, हिरवी मिरची, कांदा, आलं, तांदळाचे पीठ, बेसन, गव्हाचे पीठ, ओवा, जिरे, मसाले, तूप, मीठ, तेल इत्यादी साहित्य लागते.
मटार पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तेल टाका. त्यानंतर यात जिरे , लसूण, हिरवी मिरची आणि आलं टाकून चांगले परतून घ्या.
यात मटार घालून ते शिजेपर्यंत परता. मटार मॅश करून घ्या. जेणेकरून पराठा लाटताना दाणे बाहेर येणार नाहीत.
मिश्रण गार झाल्यावर त्यात पाणी न घालता ते जाडसर वाटून घ्या. तुम्ही यात इतर मसाले, ओवा घालून मिक्स करा.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा गोल्डन फ्राय करून घ्या. त्यात मटारचे मिश्रण आणि चवीनुसार मीठ घाला . सर्व चांगले एकजीव करा.
परातीत गव्हाचे पीठ, बेसन, तांदळाचे पीठ, मीठ आणि थोडे थोडे पाणी टाकून कणिक मळून घ्या. छोटे गोळे करून त्याची पारी लाटा.
गव्हाच्या पीठाच्या पारीत मटारचे सारण भरून ती लाटून घ्या. पॅनमध्ये तूप टाकून पराठा दोन्ही बाजूंनी शिजवा. वरून पुन्हा तूप टाका.
तूप आणि पुदिन्याच्या चटणीसोबत मटार पराठ्याचा आस्वाद घ्या. तसेच तुम्ही गरमागरम चहासोबतही मटार पराठा खाऊ शकता.