Vivian-Rajat Fight
Bigg Boss 18SAAM TV

Bigg Boss 18: विवियनने रजतला खाली आपटलं; बिग बॉसच्या घरात नवीन राडा, पाहा VIDEO

Vivian-Rajat Fight: बिग बॉसच्या घरात नवीन राडा पाहायला मिळत आहे. टास्क दरम्यान विवियनने रजतला खाली पाडले आहे. ज्यामुळे घरातील वातावरण बिघडले.
Published on

'बिग बॉस 18' (Bigg Boss 18) सध्या सर्वत्र गाजत आहे. घरात रोज एक नवीन राडा पाहायला मिळत आहे. सध्या बिग बॉसच्या घरात विवियनची सत्ता पाहायला मिळत आहे. कारण विवियन डिसेना टाइम गॉड (Time God) आहे.

आता बिग बॉसच्या घरात नवीन टाईम गॉडच्या निवडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे घरात टाइम गॉडचा टास्क खेळला जात आहे. या टास्कमध्ये विवियन डिसेना (Vivian Dsena) आणि रजत दलाल (Rajat Dalal) यांच्यात हातापायी झालेली पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे साराचे मेंटल ब्रेकडाऊन झालेले पाहायला मिळत आहे. ती सामान फेकताना दिसत आहे.

टाइम गॉडच्या खेळासाठी घरात दोन टीम पाडण्यात आल्या. एका बिग बॉसने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये विवियन डिसेना आणि अविनाश मिश्रा (Avinash Mishra) रजतबद्दल बोलताना पाहायला मिळत आहे. त्यानंतर विवियन रजत दलालला खाली पाडताना दिसतो. एकंदर विवियन, रजत आणि अविनाशमध्ये हातापायी होते.

बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात चार सदस्य नॉमिनेट झाले आहेत. ताजिंदर सिंह बग्गा, चाहत पांडे, सारा अरफीन आणि अरफीन खान यांचा समावेश आहे. आता बिग बॉसच्या घरातून कोण घराबाहेर जाणार आणि नवा टाइम गॉड होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. 'वीकेंड का वार'ला सलमान खान या भांडणावर काय बोलणार? कोणाची बाजू घेणार तर कोणाची शाळा घेणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

Vivian-Rajat Fight
Vaibhav-Irina : देखो ना खुद को जरा... इरिना-वैभवचा जिममध्ये रोमँटिक डान्स; चाहते म्हणाले, 'फॉरेनची पाटलीण'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com