Riteish-Raja Shivaji Collection saam tv
मनोरंजन बातम्या

Riteish-Raja Shivaji Collection : बॉक्स ऑफिसवर रितेशचाच बोलबाला; 'राजा शिवाजी' सोमवारीही हाऊसफुल, बक्कळ कमाई करून बनवला रेकॉर्ड

Raja Shivaji Box Office Collection Day 4 : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाने चार दिवसांत बक्कळ कमाई केली आहे. मराठी आवृत्तीत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली. चित्रपटाचे चौथ्या दिवसाचे कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'राजा शिवाजी' १ मे ला रिलीज झाला आहे.

'राजा शिवाजी' लवकरच ५० कोटींचा टप्पा पार करेल.

'राजा शिवाजी' चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन दाखवण्यात आले आहे.

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला महाराष्ट्रातून भरपूर प्रेम मिळत आहे. या चित्रपटातून पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा मोठ्या पडद्यावर मांडली गेली. चित्रपटातील गाणी ऐकून अंगावर नक्कीच काटा येतो. चित्रपट रिलीज होऊन आता चार दिवस झाले आहे. चार दिवसांत 'राजा शिवाजी' ने मराठी आवृत्तीत बक्कळ कमाई केली आहे. 'राजा शिवाजी' १ मे ला रिलीज झाला आहे. पहिल्या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाने ३३ कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली. आता पहिल्या सोमवारी किती कोटी कमावले, जाणून घेऊयात.

'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ४

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'राजा शिवाजी'च्या मराठीत चौथ्या दिवशी (पहिल्या सोमवारी) कमाईत घट झाली. १,७३५ शोजमधून या चित्रपटाने ४.२५ कोटी रुपयांची कमाई केली. यामुळे, या चित्रपटाच्या मराठी आवृत्तीची एकूण नेट कमाई आता २७.१५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यामुळे चित्रपटाची एकूण मराठी आणि हिंदी आवृत्ती मिळून ग्रॉस कलेक्शन ४६.९५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे, तर एकूण नेट कमाई ३९.५० कोटी इतकी झाली.

मराठी आवृत्ती कलेक्शन

  • पहिला दिवस: ८ कोटी रुपये

  • दुसरा दिवस: ७.१५ कोटी रुपये

  • तिसरा दिवस: ७.७५ कोटी रुपये

  • चौथा दिवस: ४.२५ कोटी रुपये

  • एकूण: २७.१५ कोटी रुपये

भारतातील सर्वाधिक कमाई करणारे टॉप 10 मराठी चित्रपट

  1. सैराट: 80.98 कोटी

  2. बापन भरी देवा : ७६.९२ कोटी

  3. वेद: 61.20 कोटी

  4. नटसम्राट : ४२ कोटी

  5. कट्यार काळजात घुसली : 40 कोटी

  6. राजा शिवाजी: 39.50 कोटी (चार दिवसांचे संकलन)

  7. पावनखिंड : ३७.७२ कोटी

  8. लय भारी : 37 कोटी

  9. टाईमपास: 33 कोटी

  10. क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम : 28 कोटी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT