Salman Khan Co-Star : सलमान खानच्या हिरोईनची अध्यात्मिक जीवनाला सुरुवात; अभिनयाला ठोकला रामराम, आता राहतेय वृंदावनमध्ये

Famous Actress Spiritual Journey : प्रसिद्ध अभिनेत्रीने अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. तिने एकेकाळी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत काम केले होते.
Famous Actress Spiritual Journey
Salman Khan Co-Star SAAM TV
Published On
Summary

प्रसिद्ध अभिनेत्रीने अध्यात्माचा मार्ग स्वीकारला.

अभिनेत्री आता वृंदावनमध्ये राहते.

अभिनेत्रीने सलमान खानसोबत काम केले आहे.

मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी अभिनय क्षेत्र सोडून अध्यात्मिक मार्ग स्वीकारल्याचे आपण ऐकतो. अशात आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीने अभिनय सोडून अध्यात्माची वाट पकडली आहे. टीव्ही अभिनेत्री अण्णा जयसिंघानीने अभिनय सोडून अध्यात्मिक मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. तिने आपले जीवन कृष्णाच्या भक्तीसाठी समर्पित केले आहे. इतकेच नाही तर, ती आता वृंदावनमध्ये राहू लागली आहे.

अभिनेत्रीने सांगितल्यानुसार तिला, "भक्तीमध्ये खरी शांती मिळते, म्हणून तिने मुंबई आणि इंडस्ट्रीचे ग्लॅमरस जग सोडून अध्यात्माचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला..." अभिनेत्रीने ही सर्व माहिती तिच्या 'मेरो वृंदावन' या यूट्यूब चॅनलवर दिली. अण्णा जयसिंघानीने आता तिचे नाव बदलून अण्णा परी हरिवंशी असे ठेवले आहे. अभिनेत्री अण्णा जयसिंघानीचे 'बीए इंग्लिश ऑनर्स'मध्ये शिक्षण झाले आहे.

अण्णा जयसिंघानी ही मुळची ग्वाल्हेरची आहे. तिला लहानपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड आहे. तिने २०११ मध्ये एक फ्रीलान्स कोरिओग्राफर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. याच काळात तिला सलमान खान आणि कोरिओग्राफर थॉमस पॉलसन यांच्यासोबत काम करण्याची संधीही मिळाली. अभिनेत्रीने सांगितले की, "कोरिओग्राफीचे काम चांगले चालले होते, पण मला अभिनयात करिअर करायचे होते... यामुळे तिने एकता कपूरच्या प्रोडक्शन हाऊस, बालाजी टेलीफिल्म्समध्ये अभिनयाच्या कोर्ससाठी प्रवेश घेतला. त्यानंतर तिने 'क्राईम पेट्रोल' आणि 'सावधान इंडिया' सारखे शो केले... पण तिला खरी ओळख 'देखा एक ख्वाब' या मालिकेमुळे मिळाली... "

अभिनेत्रीने अध्यात्मिक मार्ग स्वीकारण्याचा निर्णयावर म्हणाली की, "मुंबईत माझे काही मित्र-मैत्रिणी झाले जे नेहमी इस्कॉनमध्ये जात असत. मी त्यांच्यासोबत इस्कॉनमध्ये जाऊ लागले आणि हळूहळू ती जीवनशैली स्वीकारली. मी लसूण, कांदा, दारू आणि मांसाहार सोडला. इस्कॉनमध्ये सामील झाल्यानंतर, मी वृंदावनला जाण्यासाठी कुंज बिहारी (कृष्ण) यांची प्रार्थना करू लागले...एक दिवस, प्रेमानंदजी महाराज माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी मला पवित्र नामाचा जप करण्यास सांगितले. या अनुभवाचा माझ्यावर खूप खोलवर परिणाम झाला...मी महाराजांकडून दीक्षा घेतली आणि कृष्णाची भक्त म्हणून आपले जीवन जगण्याचा निश्चय केला, कारण श्री नामाचा जप केल्याशिवाय जीवन अपूर्ण आहे. "

Famous Actress Spiritual Journey
Riteish-Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिसवर सुसाट; रितेश भाऊंनी रविवारी केली छप्परफाड कमाई, रचला नवा इतिहास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com