Wai Tourism : 'राजा शिवाजी'चे शूटिंग झालेल्या 'वाई'मधील ५ ऐतिहासिक ठिकाणे, आताच प्लान करा उन्हाळी सहल

Shreya Maskar

सातारा - वाई

सातारा जिल्ह्यात वाई हे ऐतिहासिक शहर वसलेले आहे. वाई हे ठिकाण 'दक्षिण काशी' म्हणून प्रसिद्ध आहे. उन्हाळी सुट्टींमध्ये येथे नक्की भेट द्या. लहान मुल आवडीने ही ठिकाणे पाहतील.

Satara – Wai | google

संगम माहुली

संगम माहुली हे तीर्थक्षेत्र सातारा शहरापासून साधारणपणे ५ किमी अंतरावर आहे. कृष्णा आणि वेण्णा या नद्यांच्या पवित्र संगमावर संगम माहुली ठिकाण वसलेले आहे. १८ व्या शतकातील हेमाडपंथी शैलीतील मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये श्री काशी विश्वेश्वर मंदिर आणि रामेश्वर मंदिराचा प्रामुख्याने समावेश होतो.

Sangam Mahuli | google

मेणवली घाट

मेणवली घाट वाई शहरापासून सुमारे ३ ते ४ किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीच्या काठावर वसलेला आहे. हे ठिकाण वाई-महाबळेश्वर रस्त्यावरून धोम धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर येते आणि पेशवेकालीन नाना फडणवीस वाड्यामुळे प्रसिद्ध आहे.

Menavali Ghat | google

ढोल्या गणपती मंदिर

वाई येथील कृष्णा नदीच्या काठावर स्थित ढोल्या गणपती मंदिर हे एक अत्यंत प्राचीन आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर १८ व्या शतकातील आहे. येथे शांत वातावरण अनुभवता येते.

Dholya Ganpati Temple | google

किल्ले

वाई येथे कमलगड किल्ला आणि पांडवगड किल्ला आहे. पांडवगड किल्ला हा ट्रेकिंगसाठी उत्तम स्थळ आहे. कमलगड किल्ला चढण्यास अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक आहे.

Forts | google

धोम धरण

वाई शहराच्या जवळ धोम धरण वसलेले आहे. हे धरण कृष्णा नदीवर बांधण्यात आले आहे. पर्वतांनी वेढलेले एक शांत आणि विशाल धरण म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

Dhom Dam | google

मंदिरे

वाई येथे श्री काशी विश्वेश्वर मंदिर आणि लक्ष्मी नरसिंह मंदिर ही पवित्र स्थाने आहेत. श्री काशी विश्वेश्वर मंदिर हे कृष्णा नदीच्या काठावर वसलेले, भगवान शंकराला समर्पित प्राचीन मंदिर आहे.

Temples | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

disclaimer | google

NEXT : "शिवाजी नाही, शिवाजी राजे म्हणायचं!"; Raja Shivaji मधील ५ जबरदस्त डायलॉग, ऐकून काळीज धडधडेल अन् थरकाप उडेल

Raja Shivaji' Release Date | instagram
येथे क्लिक करा...