Riteish- Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी' १ नंबर ! रितेशच्या चित्रपटाने 'सैराट'लाही पछाडलं, रेकॉर्ड ब्रेक करत कमावले तब्बल 'इतके' कोटी

Raja Shivaji Box Office Collection Day 1 : 'राजा शिवाजी' ने पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. जगभरात रितेश देशमुखच्या चित्रपटाची बोलबाला पाहायला मिळत आहे. एकूण कलेक्शन किती जाणून घेऊयात.
Raja Shivaji Box Office Collection Day 1
Riteish- Raja Shivaji Collection SAAM TV
Published On
Summary

'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला रिलीज झाला.

'राजा शिवाजी'ने पहिल्याच दिवशी मराठी चित्रपट विश्वात रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली.

'राजा शिवाजी'मधून रितेश भाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा सांगितली आहे.

बॉलिवूड आणि मराठी अभिनेता रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट 'राजा शिवाजी' अखेर थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने बंपर कमाई केली आहे. 'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत रितेश देशमुख झळकला असून तो या चित्रपटाचा दिग्दर्शक देखील आहे. तसेच चित्रपटाची निर्माती जिनिलिया देशमुख आहे.

'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल ११ कोटी रुपयांवर कमाई केली आहे. मराठी आवृत्तीत नेट कलेक्शन ८ कोटी रुपये झाले आहे. तर हिंदी आवृत्तीत ३.३५ कोटी रुपयांची कमाई सिनेमाने केली आहे. मराठी चित्रपटांच्या इतिहासातील पहिल्या दिवसाच्या सर्वाधिक कमाईच्या यादीत 'राजा शिवाजी' चित्रपटाने अव्वल स्थान पटकावले आहे. या ऐतिहासिक ॲक्शन-ड्रामा चित्रपटाने केवळ १,९४१ शोजमधूनच हा टप्पा गाठला असून, ६८% इतकी मजबूत सरासरी उपस्थिती (occupancy) नोंदवली आहे. ही विक्रमी सुरुवात होण्यामागे चित्रपटाचे अभूतपूर्व 'ॲडव्हान्स बुकिंग' हे प्रमुख कारण ठरले.

चित्रपटाची एकूण कमाई १० कोटींचा टप्पा ओलांडून ११.३५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. 'राजा शिवाजी' चित्रपटात मराठी आणि बॉलिवूडचे तगडे कलाकार पाहायला मिळत आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची देखील छोटी भूमिका पाहायला मिळाली. 'राजा शिवाजी' मध्ये सलमान खान शिवरायांचा शूर अंगरक्षक जीवा महाला यांच्या भूमिकेत दिसला आहे. चित्रपटात भाईजानचा कॅमिओ आहे.

'राजा शिवाजी'ने 'सैराट'चा रेकॉर्ड मोडला

प्रदर्शनापूर्वीच, 'राजा शिवाजी'ने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये एकूण ५.१४ कोटी रुपयांची कमाई केली. ज्यामधून केवळ मूळ मराठी आवृत्तीद्वारेच अंदाजे ४.२५ कोटी रुपये (निव्वळ ३.६० कोटी रुपये) इतकी कमाई झाली.या कामगिरीसह, या चित्रपटाने 'सैराट' आणि 'टाइमपास २' यांचे पहिल्या दिवसाच्या कमाईचे अनेक वर्षांपासूनचे रेकॉर्ड सहजपणे मोडीत काढले.'सैराट' चित्रपटाने पहिल्या दिवशी ४.२३ कोटींची कमाई केली होती. तर 'टाईमपास २' ने ३.७५ कोटी कमावले होते.

Raja Shivaji Box Office Collection Day 1
Monalisa : "मला १० वेळा स्पर्श केला"; 'व्हायरल गर्ल' मोनालिसाचा दिग्दर्शकावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com